Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाअवघ्या 12 वर्षांच्या वयात ग्रँडमास्टर, 19 वर्षांपूर्वींचा रशियाचा रेकॉर्ड मोडला, भारताच्या अभिमन्यु...

अवघ्या 12 वर्षांच्या वयात ग्रँडमास्टर, 19 वर्षांपूर्वींचा रशियाचा रेकॉर्ड मोडला, भारताच्या अभिमन्यु मिश्राची कमाल | Indian Origines Abhimanyu Mishra a 12 year old Becomes Youngest Grandmaster in chess History

बुद्धीबळ या खेळात भारताने अनेक यश संपादन केली आहेत. जगज्जेता विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) यांनी भारताला अनेक मान मिळवून दिले. त्यानंतर आता एका 12 वर्षीय बुद्धीबळपटूने अवघ्या 12 वर्षांच्या वयात ग्रँडमास्टर होण्याचा खिताब पटकावला आहे.

अवघ्या 12 वर्षांच्या वयात ग्रँडमास्टर, 19 वर्षांपूर्वींचा रशियाचा रेकॉर्ड मोडला, भारताच्या अभिमन्यु मिश्राची कमाल

अभिमन्यु मिश्रा

नवी दिल्ली : मूळचा भारतीय असणाऱ्या अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या अभिमन्यु मिश्राने (Abhimanyu Mishra) बुद्धीबळ खेळाच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा खिताब पटकावला आहे. त्याने रशियाच्या सर्जी कर्जाकिन (Sergey Karjakin) याच्या नावावर असणारा 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत हा मान मिळवला आहे. रेकॉर्ड करताना अभिमन्यूचे वय 12 वर्षे 4 महिने आणि 25 दिवस इतके होते. तर रशियाच्या सर्जी याने रेकॉर्ड केला असताना ऑगस्ट, 2002 मध्ये सर्जीचे वय 12 वर्षे 7 महिने होते. त्यामुळे 3 महिन्यांच्या फरकाने अभिमन्यूने हा रेकॉर्ड तोडला आहे. (Indian Origines Abhimanyu Mishra a 12 year old Becomes Youngest Grandmaster in chess History)

अभिमन्यु मिश्राने बुडापेस्ट येथे आयोजित ग्रँडमास्टर टूर्नामेंटमध्ये ग्रँडमास्टर लियॉन मेनडोंका (Leon Mendonca) याला पराभूत करत हे यश मिळवले आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अभिमन्यू म्हणाला, “लियॉनच्या विरोधातील हा सामना अत्यंत कठीण होता. शेवटच्या वेळेत लियॉनने केलेल्या चूकीचा मला फायदा झाला आणि मी त्याला पराभूत करु शकलो. या विजयासोबत सर्वात लहान ग्रँडमास्टर बनल्यामुळे मी खूप आनंदी आहे.”

वडिलांचा निर्णय, मुलाची कमाल

अभिमन्यूचे वडिड अमेरिका येथील न्यू जर्सीमझ्ये सॉफ्टवेअर इंजीनियर आहेत. त्यांनी आपला मुलगा युरोपला जाऊन ग्रँडमास्टर टूर्नामेंट खेळेल असा मोठा निर्णय घेतला. ज्या निर्णयावर अभिमन्यूही खरा उतरला आणि त्याने इतिहास रचत सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर बनला. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अभिमन्यूचे वडिल हेमंत म्हणाले, ”आम्हाला माहित होतं की ही स्पर्धा आमच्या मुलासाठी एक मोठी संधी आहे. आम्ही या स्पर्धेसाठी एप्रिलमध्येच बुडापेस्टमध्ये आलो होतो. हे माझं आणि माझी पत्नी स्वातीचं स्वप्न होतं की आमचा मुलगा बुद्धीबळ खेळात सर्वात कमी वयात ग्रँडमास्टर बनावा. आज हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत.”

असा मिळवला ग्रँडमास्टरचा ‘ताज’

ग्रँडमास्टर बनण्यासाठी 100 ELO पॉईंट आणि 3 GM नॉर्म्सची गरज असते. अभिमन्यूला ही गोष्ट माहित होती. एप्रिलमध्ये अभिमन्युने पहिला GM नॉर्म मिळवला होता. त्यानंतर मेमध्ये दुसरा GM नॉर्म आणि आता तिसरा GM नॉर्म मिळवत अभिमन्यू ग्रँडमास्टर बनला आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics : साजन प्रकाशचं घवघवीत यश, ऑलम्पिकसाठी पात्र होणारा पहिला भारतीय जलतरणपटू, वाचा कशी मिळाली पात्रता

Tokyo Olympics साठी हिमा दास नाही, तर ‘ही’ भारतीय धावपटू पात्र, खेल रत्न पुरस्कारासाठीही शिफारस

Tokyo Olympics मध्ये आणखी एका भारतीय जलतरणपटूची वर्णी, इतिहासांत पहिल्यांदाच आला ‘हा’ योग

(Indian Origines Abhimanyu Mishra a 12 year old Becomes Youngest Grandmaster in chess History)Source link

अवघ्या 12 वर्षांच्या वयात ग्रँडमास्टर, 19 वर्षांपूर्वींचा रशियाचा रेकॉर्ड मोडला, भारताच्या अभिमन्यु मिश्राची कमाल | Indian Origines Abhimanyu Mishra a 12 year old Becomes Youngest Grandmaster in chess History
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News