Monday, June 21, 2021
Homeपुणेआदित्य ठाकरेंना मुलगी पाहण्यासाठी पंतप्रधानांनाही पत्र पाठवतील, चंद्रकांत पाटलांचा टोला | Pune

आदित्य ठाकरेंना मुलगी पाहण्यासाठी पंतप्रधानांनाही पत्र पाठवतील, चंद्रकांत पाटलांचा टोला | Pune


आदित्य ठाकरेंना मुलगी पाहण्यासाठी पंतप्रधानांनाही पत्र पाठवतील, चंद्रकांत पाटलांचा टोला

‘आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्यला लग्नाकरिता मुलगी पाहिजे आहे म्हणून…’

मुंबई, 01 जून: या ना त्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर (Thackery Government) टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्यावर टीका करताना तोल ढळला. आदित्य ठाकरे यांना मुलगी पाहायची असेल तर पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना नेहमी प्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आणि 12 च्या परिक्षांबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असं जनतेशी संवाद साधत असताना सांगितलं होतं. या मुद्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्यला लग्नाकरिता मुलगी पाहिजे आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवतील’

राज्यात कधीपर्यंत दाखल होणार मान्सून, कसं करावं पिकांचं नियोजन?

तसंच, ‘शरद पवार आजारी आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस भेटायला गेले होते. पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूर करण्यासाठी गेले. त्यामध्ये राजकीय काही नव्हतं. त्यानंतर ते जळगावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत’ असंही पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्यात. लवकरच ते आपली भूमिका जाहीर करणार आहे. पण खासदार छत्रपती संभाजीराजेंनी राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे का? मुळात, महाविकास आघाडी सरकार हे कोडगे सरकार आहे. त्यांची संभाजीराजेंवर हेरगिरी सुरू आहे, त्याचा मी निषेध करतो, असंही पाटील म्हणाले

त्याच्या मोबाईल चोरीमुळे 3 महिन्याचे बाळ झाले पोरके, मुंबईतील मन हेलावून टाकणारी

‘कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करत आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढली, गर्दी जमवली हे चुकीचे आहे. महेश लांडगे यांना समज देण्यात येईल, असंही पाटील यांनी सांगितलं.

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयात केंद्राचा काय संबंध आहे, राज्य सरकारने दीड वर्षांपासून मागासवर्गीय आयोग नेमला नाही, त्यांनी तो आधी नेमावा, मग पुढे बोलाव


Published by:
sachin Salve


First published:
June 1, 2021, 1:42 PM ISTSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW