Monday, June 21, 2021
Homeमुंबईआलिशान मोटारीतून फेरफटका पडला महागात; मास्क नसल्याने पुण्याच्या कुटुंबाला ठोठावला दंड

आलिशान मोटारीतून फेरफटका पडला महागात; मास्क नसल्याने पुण्याच्या कुटुंबाला ठोठावला दंड


वृत्तसंस्था

पुणे : नवी कोऱ्या लँम्बोर्घिनी या आलिशान गाडीतून फेरफटका मारणे सहकारनगरमधील एका कुटुंबाला महागात पडले. नव्या गाडीतून फेरफटका मारण्याच्या नादात कुटुंबाने मास्कच घातला नसल्याने त्यांना दंड भरावा लागला. Expensive to ride in a luxury car; Pune family fined for not wearing mask

तीन कोटीपेक्षाही अधिक किमतीची ही आलिशान मोटार एका कुटुंबाने खरेदी केली. या गाडीतून फेरफटका मारायला ते तळजाई पठारावर निघाले. अचानक पोलिसांनी अडविले. महिला चालक आणि इतर दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. नव्या गाडीच्या नादात ते मास्क घालायला विसरले होते.तळजाई टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या चौकात पोलिसांची तपासणी सुरु होती. तेव्हा हे कुटुंब विनामास्क आढळून आले. कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तुम्ही कोणीही असा, कोणतीही गाडी घेऊन या, मात्र शासनाचे नियम पाळले नाहीत तर तुमच्यावर कारवाई होणारच आहे.

Expensive to ride in a luxury car; Pune family fined for not wearing mask

महत्त्वाच्या बातम्याSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW