Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहितऐवजी मंयकला सलामीला खेळवावं : सुनील गावस्कर | IND...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहितऐवजी मंयकला सलामीला खेळवावं : सुनील गावस्कर | IND vs ENG : Sunil Gavaskar Suggests India Should Try Mayank Agarwal And Shubman Gill As Opener In Practice Gamesसुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारताच्या सलामीच्या जोडीबाबत बदल सुचवला आहे. त्यांच्या मते रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) सलामीच्या जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहितऐवजी मंयकला सलामीला खेळवावं : सुनील गावस्कर

Rohit Sharma

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील (ICC World Test Championship Final) पराभवामागे भारतीय संघाची (Indian Cricket Team) कमकुवत फलंदाजी हे सर्वाधिक चिंतेचे कारण ठरले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांनी भरलेल्या भारतीय फलंदाजीला संपूर्ण सामन्यात एकही अर्धशतक करता आले नाही. विशेषत: दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज शरणागती पत्करताना दिसले. दरम्यान, ऑगस्टपासून खेळवण्यात येणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत काही मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. मुख्यत: मधल्या फळीविषयी विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारताच्या सलामीच्या जोडीबाबत बदल सुचवला आहे. त्यांच्या मते रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) सलामीच्या जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. (IND vs ENG : Sunil Gavaskar Suggests India Should Try Mayank Agarwal And Shubman Gill As Opener In Practice Games)

भारतीय संघात, प्रामुख्याने चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी गेल्या जवळपास 2 वर्षांपासून एकही शतक झळकावलेलं नाही. पुजाराने शेवटचे शतक जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर ठोकलं होतं. त्यानंतर त्याला कोणतीही मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर अंतिम सामन्यातही अपयशी ठरल्यानंतर पुजाराच्या जागी भारतीय संघ केएल राहुल किंवा इतर कोणत्याही फलंदाजाला संधी देऊ शकतो, अशी चर्चा आहे. तथापि, गावस्कर याबाबत सहमत नाहीत आणि पुजाराचे संघातील स्थान कायम ठेवावे अशी त्यांची इच्छा आहे. मात्र रोहित शर्माच्या जागी मयंक अग्रवाल याला सलामीला मैदानात उतरवावे, अशी सूचना गावस्कर यांनी केली आहे.

सराव सामन्यात मयंक-शुबमन जोडी सलामीला येईल

सराव सामन्यात मयंक-शुबमन जोडी सलामीला येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. परंतु हे खरे आहे. वास्तविक इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळणार आहे. बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला सराव सामने आयोजित करण्याची विनंती केली आहे. गावसकरांना असा विश्वास आहे की, या सराव सामन्यात रोहितला संधी न देता मयंक आणि शुभमन ही जोडी सलामीला उतरवली पाहिजे आणि त्यानंतर कसोटी मालिकेत रोहितसोबत सलामीवीर कोण असेल, हे ठरवावे. स्पोर्ट्स तकशी बोलताना गावस्करांनी अशी सूचना दिली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
  • दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
  • तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
  • चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
  • पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव

इतर बातम्या

WTC Final नंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ‘या’ तीन खेळाडूंवर टांगती तलवार, संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची दाट शक्यता

“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”

WTC Final मध्ये ‘या’ खेळाडूला खेळवणं भारताची चूक, माजी क्रिकेटपटूने केला मोठा दावा

(IND vs ENG : Sunil Gavaskar Suggests India Should Try Mayank Agarwal And Shubman Gill As Opener In Practice Games)Source link

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहितऐवजी मंयकला सलामीला खेळवावं : सुनील गावस्कर | IND vs ENG : Sunil Gavaskar Suggests India Should Try Mayank Agarwal And Shubman Gill As Opener In Practice Games
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News