Sunday, July 25, 2021
Homeपुणेइंदापूरात खाजगी सावकारीचं पेव; व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जिवंत जाळलं | Crime

इंदापूरात खाजगी सावकारीचं पेव; व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जिवंत जाळलं | Crime


इंदापूरात खाजगी सावकारीचं पेव; व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जिवंत जाळलं

व्याजानं दिलेल्या पैशासाठी (interest money) इंदापूरात (Indapur) एका तरुणाला जिवंत जाळल्याची (young man burned alive) घटना समोर आली आहे. आरोपींनी जमीन नावावर करून देण्यासाठी तगादा लावला होता.

इंदापूर, 25 जून: व्याजानं दिलेल्या पैशासाठी (interest money) इंदापूरात (Indapur) एका तरुणाला जिवंत जाळल्याची (young man burned alive) धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित तरुण 95 टक्के भाजल्यानं उपचारादरम्यान तीन दिवसांनी त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. व्याजाच्या पैशांसाठी आरोपींनी तरुणाचं अपहरण केलं होतं. 13 दिवस एका खोलीत कोंडून ठेवल्यानंतर आरोपींनी पैशांच्या बदल्यात जमीन नावावर करुन देण्याची मागणी केली. आरोपींच्या मागणीला नकार दिल्यानं आरोपींनी तरुणाला एका जंगलात नेऊन जिवंत जाळलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या (2 arrest) आहेत.

नवनाथ हनुमंत राऊत आणि सोमनाथ भीमराव जळक असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर शिवराज ऊर्फ शिवराम कांतिलाल हेगडे असं 27 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. मृत तरुण इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील रहिवासी आहे. शिवराज याच्यावर सोलापूरातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्यानं अखेरचा श्वास घेतला आहे. उपचार सुरू असतानाच तरुणानं आरोपींविरोधात जबाब दिला आहे. या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा-व्हेल माशाची उलटी विकणाऱ्याला मुंबईत अटक, उलटीची किंमत तब्बल 7.75 कोटी रुपये

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी 7 जून रोजी बंदुकीच्या धाकानं संबंधित तरुणाचं अपहरण केलं होतं. तुझ्याकडे अद्याप व्याजाचे पैसे बाकी असल्याचं म्हणत आरोपींनी शिवराजला 13 दिवस एका खोलीत डांबून ठेवलं. दरम्यान आरोपींनी पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्याची मागणी केली. अपहरण झालेल्या तरुणानं आरोपींची मागणी अमान्य केली. त्यामुळे आरोपींनी तरुणाला जंक्शन फॉरेस्ट परिसरात आणून त्याचावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा-मुंबई पोलिसांनी 24 तासांत अपहरण झालेल्या मुलीची केली सुटका; आरोपीला बेड्या

दुसरीकडे जाळ लागलेल्या तरुणानं स्वतः जमीनीवर लोळत आग विझवली आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी पीडित तरुणाची मदत केली. आणि या घटनेची माहिती तरुणाच्या घरच्यांना दिली. तरुणाचा शरीर 95 टक्के भाजल्यानं त्याला उपचारासाठी सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी पीडित तरुणानं अखेरचा श्वास घेतला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Published by:
News18 Desk


First published:
June 25, 2021, 8:48 AM IST

Source link

इंदापूरात खाजगी सावकारीचं पेव; व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जिवंत जाळलं | Crime
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News