Sunday, July 25, 2021
Homeपुणेएकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांनाही होतं समन्स, 14 दिवसांची मागितली वेळ |...

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांनाही होतं समन्स, 14 दिवसांची मागितली वेळ | Pune


एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांनाही होतं समन्स, 14 दिवसांची मागितली वेळ

Eknath Khadse Wife ED Summons: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या पत्नीला समन्स पाठवण्यात आले होते.

मुंबई, 09 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीनं समन्स बजावलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. गुरुवारी खडसे यांची ईडी कार्यालयात तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. पुण्यातील भोसरी MIDC जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं.

मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी निवेदन देऊन 14 दिवसांची वेळ मागितली आहे. मात्र ईडीने त्यांना अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याचं समजतं आहे. मंदाकिनी यांना ईडीनं 7 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र त्या हजर राहिल्या नाहीत.

हेही वाचा- लवकरच ईडीच्या चौकशीत सचिन वाझे करणार मोठे खुलासे?

एकनाथ खडसेंची 9 तास चौकशी

भोसरी जमीन घोडाळा (Bhosari Land Scam) प्रकरणात एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशी (ED interrogates Eknath Khadse for 9 hours) झाली. ही चौकशी झाल्यावर एकनाथ खडसे यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया देत माहिती दिली, एकनाथ खडसे यांनी ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. सर्व कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत आणि उर्वरित कागदपत्रे 10 दिवसांत सबमिट करू. एकनाथ खडसे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलेले नाहीये मात्र, गरज पडल्यास एकनाथ खडसे पुन्हा चौकशीसाठी हजर होतील.

हेही वाचा- ईडीची पिडा, भोसरीनंतर ‘ते’ जमीन प्रकरण एकनाथ खडसेंना पडणार महागात? 

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.


Published by:
Pooja Vichare


First published:
July 9, 2021, 12:06 PM IST

Source link

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांनाही होतं समन्स, 14 दिवसांची मागितली वेळ | Pune
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News