Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाएमएस धोनीचा नव्या लूकमधून सामाजिक संदेश, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणतात...

एमएस धोनीचा नव्या लूकमधून सामाजिक संदेश, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणतात आधी… | CSK shares MS Dhoni Photo With Plant Trees and Save Forest Message On Twitter

एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्तीनंतर जास्त वेळ फॅमिलीसोबत घालवतानाच दिसून येतो. सध्या देखील तो त्याच्या फॅमिलीसोबत शिमल्यात सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे. त्याचवेळी धोनीचा एक फोटो चेन्नई सुपरकिंगने त्यांच्या सोश मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर नेटकरी विविध कमेंट्स करत आहेत.

एमएस धोनीचा नव्या लूकमधून सामाजिक संदेश, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणतात आधी...

msd

शिमला : भारतीय संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार ज्याने सर्व प्रकारच्या आयसीसी ट्रॉफी भारताला जिंकवून दिल्या होत्या, तो म्हणजे एमएस धोनी (MS Dhoni). सर्व भारतीयांचा आवडता धोनी जे काही करतो ते सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होते. मग धोनीचा नवा लूक असो किंवा त्याने घेतलेली नवी बाईक. सध्या धोनी आयपीएल रद्द झाल्यानंतर फॅमिलीसोबत शिमल्यामध्ये सुट्ट्या घालवत आहे. यावेळी त्याने मिश्या वाढवून एक नवा लूक केला आहे. ज्याचे फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. (CSK shares MS Dhoni Photo With Plant Trees and Save Forest Message On Twitter)

त्यानंतर आता त्याच लूकमधील एक फोटो धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपरकिंग (CSK) संघाने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला असून यात झाडे लावा आणि जंगल वाचवा असा संदेश लिहिलेल्या फलकाशेजारी धोनी उभा दिसत आहे. दरम्यान या फोटोवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत असून प्रत्येकजण आपलं मत मांडत आहे. कोणी धोनीचं कौतुक करत आहे. तर काही संबधित संदेश लाकडावरच लिहिला असल्याने खिल्ली उडवत आहे.

उर्वरीत IPL साठी क्रिकेटप्रेमी उत्सुक

कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेली आयपीएल 2021 (IPL 2021) सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान युएईमध्ये (UAE ) घेतली जाणार असल्याचं बीसीसीआयने (BCCI) काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं. दरम्यान धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने चाहत्यांना त्याला खेळताना पाहण्यासाठी आयपीएल हा एकच पर्याय असल्याने उर्वरीत आयपीएलसाठी सर्वच क्रिकेटप्रेमींसह धोनीचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या 

Photo : तुम्ही पाहिलंत का धोनीचं फार्म हाऊस? कुत्र्यांपासून घोडे आणि फळबागांनी नटलंय

IPL 2021: परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी BCCI ची धडपड, ‘या’ खास रणनीतीचा वापर

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार पुन्हा बदलणार, कोण असेल नवा कर्णधार?

(CSK shares MS Dhoni Photo With Plant Trees and Save Forest Message On Twitter)

Source link

एमएस धोनीचा नव्या लूकमधून सामाजिक संदेश, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणतात आधी... | CSK shares MS Dhoni Photo With Plant Trees and Save Forest Message On Twitter
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News