Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाकामाची गती पाहता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, शरद पवारांकडून...

कामाची गती पाहता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, शरद पवारांकडून क्रीडा विभागाचं कौतुक | NCP President Sharad Pawar Said International Sports University make opportunities to Players महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करायचा निर्णय घेतला ही चांगली गोष्ट असून या माध्यमातून अनेक जुन्या खेळाडूंना संधी मिळेल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

कामाची गती पाहता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, शरद पवारांकडून क्रीडा विभागाचं कौतुक

शरद पवार

पुणे: महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करायचा निर्णय घेतला ही चांगली गोष्ट असून या माध्यमातून अनेक जुन्या खेळाडूंना संधी मिळेल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शनिवारी शरद पवार यांनी पुण्यातल्या बालेवाडी येथे जाऊन क्रीडा विद्यापीठाच्या जागेची पाहणी केली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. (NCP President Sharad Pawar Said International Sports University make opportunities to Players)

क्रीडा विद्यापीठाचं स्वप्न पूर्ण होईल

पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या माध्यमातून या विद्यापीठाला सुंदर परिसर मिळेल. स्पोर्ट सायन्स, स्पोर्ट टेक्नॉलॉजी, स्पोर्ट कोचिंग अँड ट्रेनिंग याचे अभ्यासक्रम पहिल्या टप्प्यात सुरू केले जात आहेत. 400 कोटी रुपये या विद्यापीठासाठी मंजूर केलेले आहेत, या कामाला गती देण्याची भूमिका पाहता लवकरच स्पोर्ट युनिव्हर्सिटी चे स्वप्न पूर्ण होईल यात काही शंका नाही असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

जुन्या खेळाडूंना नव्या संधी

बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आयपीएल सुरू केले या माध्यमातून जुन्या खेळाडूंना देखील संधी मिळाली तसेच या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक संधी जुन्या खेळाडूंना नवे दालन उघडे होईल. तसेच, सीएसआर मधून क्रीडा विभागाला खेळाडूंना मदत कशी होईल यासाठी क्रीडा मंत्र्यांनी उद्योग जगताशी बैठक घेऊन खेळाडूंना नवीन संधी कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला पवारांनी यावेळी दिला.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेमागची भूमिका काय?

राज्याची क्रीडाविषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्यासाठी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेणे. क्रीडा विषयक नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात. तरुण वर्गाला क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे. या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे. हा राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्यामागचा हेतू असल्याचं क्रीडामंत्री सुनील केदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

संबंधित बातम्या:

रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआयमध्ये बंडखोरी, जिल्हाध्यक्षाची खरमरीत टीका

ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनाही आता व्ही.पी.सिंग यांची आठवण का येतेय? वाचा सविस्तर

राज्यातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे सौ चुहे खाके… जयंत पाटलांची फडणवीसांवर नाव न घेता टीका

(NCP President Sharad Pawar Said International Sports University make opportunities to Players)

Source link

कामाची गती पाहता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, शरद पवारांकडून क्रीडा विभागाचं कौतुक | NCP President Sharad Pawar Said International Sports University make opportunities to Players 
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News