Tuesday, June 22, 2021
Homeपुणेकाल अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन आणि आज लसीकरण केंद्रच बंद ; नागरिकांमध्ये...

काल अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन आणि आज लसीकरण केंद्रच बंद ; नागरिकांमध्ये नाराजी

पुणे (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

‘कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून राज्यातील प्रत्येक पात्र नागरीकाला लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे, असे सांगतानाच पुणे शहरातील हडपसर परिसरात सुरू करण्यात आलेले ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यातील हडपसर येथे उभारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे उद्घाटन करताना व्यक्त केले होते.

परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी म्हणजे आज लसीकरण बंद असल्याचे फलक केंद्राबाहेर लावण्यात आले आहे. उद्घाटन झालं पण लसच उपलब्ध नसल्याने हे केंद्र बंद ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. उदघाटन झाल्याच्या वर्तमानपत्रातील बातम्या वाचून अनेक जेष्ठ नागरिक निराश होऊन घरी परतल्याचे चित्र दिसून आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW