Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाचेतेश्वर पुजारा 'आऊट' होणार? त्याची जागा घेण्यास 'हा' मुंबईकर खेळाडू सक्षम, ऑस्ट्रेलियन...

चेतेश्वर पुजारा ‘आऊट’ होणार? त्याची जागा घेण्यास ‘हा’ मुंबईकर खेळाडू सक्षम, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा | Cheteshwar pujara could be replace by prithvi Shaw Says Australian Former Player Brad hogg‘पुजाराची जागा कोण घेऊ शकतो तर त्याचं नाव पृथ्वी शॉच असेल. मला वाटते की, सलामीपेक्षा तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी अधिक चांगल्या प्रकारे खेळू शकेल. त्याच्याकडे खूप कौशल्य आहे आणि त्याचे भविष्य चांगलं आहे, असं ब्रॅड हॉग म्हणाला. (Cheteshwar pujara could be replace by prithvi Shaw Says Australian Former Player Brad hogg)

चेतेश्वर पुजारा 'आऊट' होणार? त्याची जागा घेण्यास 'हा' मुंबईकर खेळाडू सक्षम, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा

चेतेश्वर पुजारा

मुंबई : चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) … राहुल द्रविड नंतरची भारतीय संघाची वॉल अशी त्याची ओळख… पण त्याची बॅट गेल्या दिवसांपासून मात्र शांत आहे. तिची जादू हरपली की काय? अशी शंका यावी… त्याच्या बॅटमधून शतक निघालेलं तवळपास दोन वर्ष झालंय… चमकदार कामगिरी करणाऱ्या पुजाराला नेमकं काय झालं? त्याच्या बॅटमधून धावा का निघत नाहीय, याची चर्चा आता सुरु झाली आहे. तर दुसरीकडे चेतेश्वर पुजाराचा पर्याय कोण असू शकतो, याचीही चर्चा सुरु आहे. अशातच एका फॅन्सच्या प्रश्नाला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाला दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉगने चेतेश्वर पुजाराच्या जागेसाठी मुंबईकर पृथ्वी शॉ अतिशय परफेक्ट असल्याचं म्हटलं आहे (Cheteshwar pujara could be replace by prithvi Shaw Says Australian Former Player Brad hogg)

‘पृथ्वी शॉ घेणार पुजाराची जागा’

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅग हॉगच्या मतानुसार, मुंबईकर पृथ्वी शॉ चेतेश्वर पुजाराची जागा घेऊ शकतो. चेतेश्वर पुजाराच्या जागी के एल राहुल खेळू शकतो का किंवा पुजाराचा पर्याय राहुल असेल का? असा प्रश्न एका फॅन्सने हॉगला विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने पृथ्वी शॉचं नाव घेतलं.

‘पुजाराची जागा कोण घेऊ शकतो तर त्याचं नाव पृथ्वी शॉच असेल. मला वाटते की, सलामीपेक्षा तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी अधिक चांगल्या प्रकारे खेळू शकेल. त्याच्याकडे खूप कौशल्य आहे आणि त्याचे भविष्य चांगलं आहे. तो इंग्लंड दौऱ्यात सामिल नाही, परंतु तो नक्कीच वाईल्ड कार्डची निवड आहे’, असं ब्रॅड हॉग म्हणाला.

पुजाराच्या बॅटची जादू गायब?

शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान मालिकेच्या शेवटच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजारा हिरो ठरला. त्याने या सामन्यांमध्ये 2 अर्धशतके झळकावली. तसंच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टूर्नांमेंटमध्ये 18 सामन्यात त्याच्या नावावर 841 धावा आहेत. या दरम्यान, पुजाराची सरासरी 28 होती, ज्यामध्ये त्याने 9 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

मात्र यानंतर पुजाराच्या बॅटची जादू दिसेनासी झाली. त्याच्या बॅटमधून शेवटचं शतक 2019 साली आलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2019 च्या दौऱ्यात त्याने शतक ठोकलं होतं. त्यानंतर पुजाराच्या बॅटमधून शतक आलेलं नाहीय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात देखील पुजाराने साफ निराशा केली. अतिशय महत्त्वाच्या सामन्यात देखील त्याची बॅट बोलली नाही.

(Cheteshwar pujara could be replace by prithvi Shaw Says Australian Former Player Brad hogg)

हे ही वाचा :

Ind vs Eng : शुभमन गिलच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी द्या, रनमशीन वसीम जाफरचा महत्त्वाचा सल्ला

आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO

भारत-श्रीलंका दौऱ्यापूर्वी वादाला तोंड, पाच खेळाडूंचा खेळण्यास नकार

Source link

चेतेश्वर पुजारा 'आऊट' होणार? त्याची जागा घेण्यास 'हा' मुंबईकर खेळाडू सक्षम, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा | Cheteshwar pujara could be replace by prithvi Shaw Says Australian Former Player Brad hogg
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News