Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाटी 20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवनला 'ही' गोष्ट करणे गरजेचे,...

टी 20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवनला ‘ही’ गोष्ट करणे गरजेचे, वीवीएस लक्ष्मणचा महत्त्वपूर्ण सल्ला | Indian New Skipper Shikhar Dhawan Should hit More runs in Sri lanka Tour to Secure Postion t20 World Cup Team says VVS Laxmanसध्या युवा खेळाडू असणारा भारतीय संघ (Indian Cricket team) श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) या संघाचे नेतृत्त्व करत आहे.

टी 20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवनला 'ही' गोष्ट करणे गरजेचे, वीवीएस लक्ष्मणचा महत्त्वपूर्ण सल्ला

Shikhar Dhawan

मुंबई : भारताच्या युवा खेळाडूंचा भरणा असलेला क्रिकेट संघ सध्या कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर आहे. यावेळी संघासोबत बीसीसीआयचे दोन निवडकर्ते देखील या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला अशी या दोघांची नावे असून ते आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी देता येऊ शकते हे पाहणार आहेत. युवा खेळाडूंसह दिग्गज शिखर धवनही मागील काही सामने चांगल्या फॉर्मसाठी धडपड करत असल्याने आगामी टी-20 विश्वचषकात त्याला जागा मिळवता यावी यासाठी माजी दिग्गज क्रिकेटपटू वीवीएस लक्ष्मणने त्याला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. (Indian New Skipper Shikhar Dhawan Should hit More runs in Sri lanka Tour to Secure Postion t20 World Cup Team says VVS Laxman)

आगाम टी20 विश्वचषकाच्या भारतीय संघात सलामीवीर म्हणून जागा मिळवण्यासाठी धवनने मेहनत करण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी देखील केली आहे. मात्र तरीदेखील के एल राहुल (K L Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यानंतर शिखरचा पर्याय उपलब्ध होत असल्याने त्याला आणखी मेहनत करणे गरजेचे आहे. हा श्रीलंका दौऱा त्याच्यासाठी चांगली संधी असल्याने त्याने याचा फायदा घ्यावा असं लक्ष्मणने म्हटलं आहे.

‘संधीचा फायदा उचलावा’

लक्ष्मण स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात बोलताना म्हणाला, ”टी-20 विश्वचषकाचा विचार करता शिखर धवनने या संधीचा फायदा उचलणे महत्त्वाचे आहे. भारतीय संघात जागा बनवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. त्यातच धवन श्रीलंका दौऱ्यावर कर्णधार म्हणून असल्याने त्याच्यावर इतरही जबाबदाऱ्या असतील. पण त्याने जबाबदाऱ्यांसोबतच धावा बनवून संघात स्थान सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायला हवा.’’

धावा कराव्याच लागतील

भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या मते टी-20 सामन्यांत सलामी फलंदाजानी चांगली सुरुवात करुन देणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यात भारताकडे चांगल्या फॉर्ममध्ये असणारे के एल राहुल आणि रोहिथ शर्मा हे फलंदाज असल्याने शिखरसाठी स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे त्याने जास्तीत जास्त धावा केल्यास त्याची संघात जागा सुरक्षित होऊ शकते असंही लक्ष्मणने म्हटलं.

हे ही वाचा :

WTC Final मध्ये पराभवानंतर श्रीलंका दौरा जिंकण्यासाठी युवा क्रिकेटपटू करतायत मेहनत, बीसीसीआयने शेअर केले फोटो

Video : ‘या’ स्टार खेळाडूने बॅटने नाही तर गॉल्फ स्टिकने खेळला हेलिकॉप्टर शॉट, व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी खुश

IPL 2022 बाबत मोठी माहिती समोर, स्पर्धेत होणार मोठे बदल, संघाची संख्या वाढवणार, ‘या’ कंपन्यामध्ये संघ विकत घेण्यासाठी चुरस

(Indian New Skipper Shikhar Dhawan Should hit More runs in Sri lanka Tour to Secure Postion t20 World Cup Team says VVS Laxman)Source link

टी 20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवनला 'ही' गोष्ट करणे गरजेचे, वीवीएस लक्ष्मणचा महत्त्वपूर्ण सल्ला | Indian New Skipper Shikhar Dhawan Should hit More runs in Sri lanka Tour to Secure Postion t20 World Cup Team says VVS Laxman
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News