ठाणे : उपवन तलावात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; तरुणाचा मृत्यू – thane a youth drowned in upvan lake latest update

0
22


हायलाइट्स:

  • ठाण्यातील उपवन तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
  • पोहता येत नसल्याने घडला अनर्थ
  • रात्री उशिरा सदर तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश

ठाणे : शहरातील उपवन तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सोहेल बेग असून तो ठाण्यातील हाजुरी परिसरात राहतो.

सोहेल आणि अन्य एक तरुण असे दोघे जण शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता तलावात पोहण्यासाठी उतरले. परंतु सोहेल याला पोहायला येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पोलिस आणि टीडीआरएफच्या पथकाने धाव घेतली आणि सोहेलचा तलावात शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक तास हे शोधकार्य सुरु होतं. त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांना सोहेल बेग याचा मृतदेह आढळला.

ठाणे : उपवन तलावात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; तरुणाचा मृत्यू - thane a youth drowned in upvan lake latest updateपुण्यात MPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटही लिहिली!

सदर तरुणाचा मृतदेह आज रात्री ०९:१४ वाजता स्कुबा डायव्हिंग टीमच्या मदतीने तलावाबाहेर काढून वर्तकनगर पोलिस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आणि रुग्णवाहिकेतून पुढील कार्यवाहीकरता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत कळताच सोहेलच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.Source link