Monday, June 21, 2021
Homeमुंबईथकीत वीज बिलांच्या वसुली उद्यापासून करा, महावितरणचे आदेश; ग्राहकांना जोराचा झटका

थकीत वीज बिलांच्या वसुली उद्यापासून करा, महावितरणचे आदेश; ग्राहकांना जोराचा झटका


वृत्तसंस्था

मुंबई : थकीत वीज बिलांची वसुली उद्यापासून सुरु करा, असे आदेश महावितरणने काढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना जोराचा झटका बसला आहे. Mahavitaran orders to recovery of overdue electricity bills from tommorow.

वीज निर्मिती आणि कर्जावरील व्याजाच्या बोजामुळे महावितरण संकटात सापडली असून वीज बिलांची वसुली गरजेची आहे, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यामुळे उद्यापासून वसुली सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून वीज बिलांची वसुली सुरु होणार आहे.लॉकडाऊनमध्ये लाखो लोकांचे रोजगार बुडाले होते. तेव्हा अव्वाच्या सव्वा बिले पाठवून महावितरणने त्यांच्या जखमांवर मीठ चोळले होते. सत्ताधाऱ्यांनी वीज बिलमाफीची पुडी सोडल्याने लोकांनीही बिले भरली नाहीत.

पहिला लॉकडाऊन संपताच वाढीव वीज बिले वसूल करण्यासाठी महावितरणने पावले उचलली होती. आता दुसरा लॉकडाऊन संपताच बिलांच्या वसुलीसाठी महावितरणेने उद्यापासून वसुली मोहिम राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

थकबाकी दृष्टिक्षेपात…

  •  महावितरणची गेल्या वर्षीपासून मे 2021 पर्यंत 6334 कोटींची बिले थकलेली आहेत.
  •  2020-20 मधील 4099 कोटी
  •  एप्रिल 2021 मध्ये 849 कोटी
  •  मे 2021 मध्ये 1386 कोटी

Mahavitaran orders to recovery of overdue electricity bills from tommorow.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW