Thursday, July 29, 2021
Homeक्रीडादिग्गज अष्टपैलू क्रिकेटर कपिल देव 'या' गोष्टीवरुन भारतीय गोलंदाजांवर नाराज, म्हणतात 'अशी...

दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर कपिल देव ‘या’ गोष्टीवरुन भारतीय गोलंदाजांवर नाराज, म्हणतात ‘अशी परिस्थिती पाहून वाईट वाटतं’ | Indian Legend Cricketer Kapil Dev Sad to see Indian Fast Bowlers Tired very quicklyबराच काळ भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड कपिल देव यांच्या नावावर होता. त्यानंतर अनिल कुंबळेने हा रेकॉर्ड तोडला असला तरी आजही सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान भारतीय गोलंदाज म्हणून कपिल देव यांनात ओळखले जाते.

दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर कपिल देव 'या' गोष्टीवरुन भारतीय गोलंदाजांवर नाराज, म्हणतात 'अशी परिस्थिती पाहून वाईट वाटतं'

कपिल देव

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) सध्याच्या घडीला एकापेक्षा एक भारी क्रिकेटपटू आहे. फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही भारताकडे बरेच पर्याय सध्या उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळापासून भारताकडे अव्वल दर्जाचे फलंदाज आणि गोलंदाजीत अव्वल दर्जाचे फिरकीपटू होते. मात्र अलीकडे भारतीय संघातून चांगले वेगवान गोलंदाजही खेळू लागल्याने संघाच्या खेळात आणखी सुधार झाला आहे. मात्र या वेगवान गोलंदाजांच्या एका गोष्टीवर भारताचे सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाज म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही असे कपिल देव (Kapil Dev) नाराज आहेत. (Indian Legend Cricketer Kapil Dev Sad to see Indian Fast Bowlers Tired very quickly)

कपिल देव यांच्या मते भारताचे वेगवान गोलंदाजा गोलंदाज गोलंदाजी चांगले करत असले तरी ते लवकर थकतात त्यामुळे त्यांना अधिक काळ गोलंदाजी करता येत नाही. ज्यामुळे विकेट्स घेण्यातही त्यांना अडचण येते. इंडिया टु़डे या वृत्तवाहिनीशी बोलताना कपिल देव यांनी हे मत मांडले. कपिल यांनी त्यांच्या वेळेचे उदाहरण देताना सांगितले, त्यांच्या वेळेस वेगवान गोलंदाजाना गोलंदाजीसह फलंदाजीचाही भार उचलायला लागत होता, मात्र आता भारताकडे तगडी फलंदाजी असल्याने गोलंदाजाना फक्त गोलंदाजी करायची असल्याने त्यांनी न थकता गोलंदाजी करणे आवश्यक आहे.

केवळ 4 ओव्हरमध्ये थकतात गोलंदाज

भारताकडून सर्वाधिक टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज म्हणजे कपिल देव. त्यांनी 434 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र सध्याचे वेगवान गोलंदाज केवळ 4 ओव्हर टाकल्यानंतर थकत असल्याचे पाहून कपिल देव यांना दुख होते. ते म्हणतात, “कधी कधी हे पाहून दुख होतेकी सध्याचे वेगवान गोलंदाज 4 ओव्हर केल्यानंतर थकतात. मी तर असेही ऐकले आहे की, त्यांना 4 ओव्हरहून अधिक गोलंदाजी करण्याची परवानगी देखील दिलेली नाही.”

हे ही वाचा –

WTC Final मधील खेळीमुळे जसप्रीतला मोठे नुकसान, अडीच वर्षानंतर ओढवली ‘ही’ परिस्थिती

ICC Test Rankings : न्यूझीलंड संघासह खेळाडूंची गरुडझेप, टॉप 10 मध्ये तीन भारतीय, ‘हा’ फलंदाज पहिल्या स्थानावर

WTC Final : केन आणि विराटचा मिठी मारतानाच्या फोटोवर केनचा खुलासा, सांगितले विराटला मिठी मारण्याचे कारण

(Indian Legend Cricketer Kapil Dev Sad to see Indian Fast Bowlers Tired very quickly)Source link

दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर कपिल देव 'या' गोष्टीवरुन भारतीय गोलंदाजांवर नाराज, म्हणतात 'अशी परिस्थिती पाहून वाईट वाटतं' | Indian Legend Cricketer Kapil Dev Sad to see Indian Fast Bowlers Tired very quickly
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News