Thursday, July 29, 2021
Homeक्रीडादिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांच निधन, भारताला पहिलं ऑलम्पिक गोल्ड मेडल मिळवून...

दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांच निधन, भारताला पहिलं ऑलम्पिक गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या संघातील खेळाडू | Indias First Hocky olympic Gold Medalist Winning Teams Hockey Legend Keshav Datt Dies in Bengalदिग्गज हॉकीपटू केशव दत्त (Keshav Datt) यांनी पश्चिम बंगाल येथील त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. 1948 आणि 1952 च्या ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या हॉकी संघातील केशव हे महत्त्वाचे खेळाडू होते.

दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांच निधन, भारताला पहिलं ऑलम्पिक गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या संघातील खेळाडू

केशव दत्त यांचे निधन

कोलकाता : स्वतंत्र भारतासाठी 1948 आणि 1952 साली ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हॉकी संघातील दिग्गज खेळाडू केशव दत्त (Keshav Datt) यांचे बुधवारी (7 जुलै) सकाळी पश्चिम बंगाल येथील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्त यांच्या निधनानंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबम आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamta Banerjee) अशा अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. ममता यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की,‘हॉकी जगताने एका महान खेळाडूला गमावले. केशव दत्त यांच्या निधनाने मी दुखी आहे. ते 1948 आणि 1952 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकवणाऱ्या संघात होते. भारत आणि बंगालचे चॅम्पियन होते. त्यांचे कुटुंब आणि मित्र यांच्याबद्दल सहानुभूती (Indias First Hocky olympic Gold Medalist Winning Teams Hockey Legend Keshav Datt Dies in Bengal)

ऑलिम्पिक विजेत्या भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू असणारे दत्त हे 1951-1953 आणि नंतर 1957-1958 मध्ये मोहन बागान या क्लबकडूनही खेळले होते. त्यांच्या उपस्थितीतच मोहन बागान संघाने 10 वर्षे  हॉकी लीगमध्ये विजय मिळवला होता. 2019 मध्ये दत्त यांना  मोहन बागान रत्न ही देण्यात आले होते.

हॉकी अध्यक्षांनीही व्यक्त केलं दुख

हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबम हे दत्त यांच्या निधनाबाबत माहिती देताना म्हणाले, ‘आज दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांच्या निधनाने आम्ही सर्वजण दु: खी झालो आहोत. ते 1948 आणि 1952 ऑलिम्पिकमध्ये भारताल सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या संघातील एकमेव जीवित खेळाडू होते. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. हॉकी इंडियाला बातमीने फार दु: ख झाले असून मी हॉकी महासंघाच्यावतीने त्यांच्या कुटूंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो”

संबंधित बातम्या:

Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांच्या शिफारसीने मिळाला ‘या’ क्रिकेटपटूला ब्रेक, विश्वचषक विजेत्या संघातही दमदार कामगिरी

Dilipkumar Death | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

(Indias First Hocky olympic Gold Medalist Winning Teams Hockey Legend Keshav Datt Dies in Bengal)

Source link

दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांच निधन, भारताला पहिलं ऑलम्पिक गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या संघातील खेळाडू | Indias First Hocky olympic Gold Medalist Winning Teams Hockey Legend Keshav Datt Dies in Bengal
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News