धक्कादायक : पत्नी आणि मुलीची हत्या करून ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या – shocking accused commits suicide by killing wife and daughter

0
14


हायलाइट्स:

  • वादामुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त
  • ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वत:लाही संपवलं
  • अमरावतीतील घटनेनं सर्वत्र खळबळ

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भामोद येथे एका इसमाने पत्नी व १६ वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, भामोद येथील रहिवासी अनिल देशमुख वय (४५) याने आपली पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील अनेक दिवसांपासून अनिल देशमुख यांचे कौटुंबिक वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी येत होती. यावरून काहीतरी गंभीर घटना घडल्याचा अंदाज नागरिकांनी आला आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

धक्कादायक : पत्नी आणि मुलीची हत्या करून ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या - shocking accused commits suicide by killing wife and daughter५ वर्षीय नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षांची शिक्षा

पोलिसांनी अनिल देशमुख यांच्या घरी पाहणी केली असता पलंगाखाली १६ वर्षीय मुलगी साक्षी अनिल देशमुख हिचा मृतदेह आढळून आला. घटनेचा पंचनामा करत असताना पोलिसांना घरातील एका कपाटाजवळ मोठ्या प्रमाणात माशा लागलेल्या दिसल्या. त्यानंतर अधिक जवळ गेले असता मोठ्या प्रमाणात दुर्गंध आल्याने पोलिसांचा संशय बळावला.

कपाट उघडले असता त्यातून देशमुख यांची पत्नी वंदना देशमुख (४०) यांचा मृतदेह आढळून आला. याच वेळी घरातील मागच्या एका खोलीत अनिल देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यासंदर्भात माहिती देताना येवला पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री बच्छाव यांनी सांगितलं की, ही घटना मागील दोन तीन दिवसांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अचूक माहिती कळू शकेल. हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाले आहे. अनिल देशमुख सातत्याने दारूच्या नशेत राहत असल्याचे तपासात समोर आले . त्यांच्याकडे मिळालेल्या सुसाईड नोटमधून त्यांनी कौटुंबिक कलहातून पत्नी व मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.Source link