Sunday, July 25, 2021
Homeपुणेपुण्यातील उद्योजक कुटुंबाकडून सुनेचा अमानुष छळ; पतीनं मारहाण करत दिली आयुष्यभराची जखम...

पुण्यातील उद्योजक कुटुंबाकडून सुनेचा अमानुष छळ; पतीनं मारहाण करत दिली आयुष्यभराची जखम | Crime


पुण्यातील उद्योजक कुटुंबाकडून सुनेचा अमानुष छळ; पतीनं मारहाण करत दिली आयुष्यभराची जखम

Crime in Pune: पुण्यातील औंध परिसरातील एका उद्योजक कुटुंबीयांनी (Businessman Family) आपल्या उच्चशिक्षित सुनेचा (educated daughter in law) अमानुष छळ (Inhuman persecution) केल्याची घटना समोर आली आहे.

पुणे, 02 जुलै: पुण्यातील (Pune) औंध परिसरातील एका उद्योजक कुटुंबीयांनी (Businessman Family) आपल्या उच्चशिक्षित सुनेचा (educated daughter in law) अमानुष छळ (Inhuman persecution) केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या कुटुंबीयांचा छळ सहन न झाल्यानं पीडित विवाहितेनं चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपी उद्योजक आणि कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सासरच्या लोकांनी केलेल्या मारहाणीत 27 वर्षीय विवाहित महिलेला बहिरेपण आलं आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय-36), नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, सोनाली गवारे, दीपक गवारे, दीपाली पाटील, भागीरथी पाटील आणि राजू अंकुश असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावं आहे. पीडित विवाहित महिला उच्चशिक्षित असून मागील काही काळापासून संबंधित आरोपींकडून तिचा अमानुष छळ केला जात होता. पीडितनं आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, पती, सासू आणि सासरे यांनी तिला वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे.

हेही वाचा-अल्पवयीन मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, गर्भवती झाल्यामुळे प्रकरणाला वाचा

त्याच बरोबर गुन्हा दाखल केलेल्या अन्य आरोपींनी देखील आपल्याला मानसिक त्रास दिल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर पीडितेचा पती गणेशनं तिला सिगरेटचे चटके देखील दिले आहेत. त्यासोबतच आरोपींनी पीडितेला मारहाण केल्यानं तिचा उजवा कान पुर्णपणे बहिरा झाला आहे.

हेही वाचा-पुणेकर महिलेला मेसेज करणं भोवलं; टोळक्यानं धुळ्यात जाऊन तरुणाला चोपलं

यामुळे आरोपींचा सततचा त्रास सहन न झाल्यानं तिनं चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींचे आणि पीडितेचे जबाब नोंदवून घेतले जात आहे.


Published by:
News18 Desk


First published:
July 2, 2021, 9:25 AM IST





Source link

पुण्यातील उद्योजक कुटुंबाकडून सुनेचा अमानुष छळ; पतीनं मारहाण करत दिली आयुष्यभराची जखम | Crime
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News