Tuesday, June 22, 2021
Homeपुणेपुण्यात पोलिसांची दंडेलशाही; कोणतंही कारण नसताना अंध तरुणाला बेदम मारहाण | Crime

पुण्यात पोलिसांची दंडेलशाही; कोणतंही कारण नसताना अंध तरुणाला बेदम मारहाण | Crime


पुण्यात पोलिसांची दंडेलशाही; कोणतंही कारण नसताना अंध तरुणाला बेदम मारहाण

पुण्यातील शुक्रवार पेठेत राहाणाऱ्या 35 वर्षीय अंध युवकाला खडक पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण (Khadak police Beat blind young man) केली आहे.

पुणे, 05 जून: पुण्यातील शुक्रवार पेठेत राहाणाऱ्या 35 वर्षीय अंध युवकाला खडक पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण (Khadak police Beat blind young man) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित अंध युवक 11 वाजता संचारबंदी लागू होण्यापूर्वी आपलं छोटसं दुकानं बंद करून दुकानासमोरच वडिलांची वाट पाहात उभा होता. यावेळी गस्तीवर असलेल्या खडक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने या युवकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हा अंध युवक आपल्या बचावासाठी पळत असताना अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पुन्हा मारहाण केली आहे.

या घटनेनंतर, मंगळवारी 35 वर्षीय पीडित युवक सुहास मालवडे याला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक नागरिकांनी एकत्र येत, खडक पोलीस ठाण्यासमोर अंदोलन केलं आहे.  संबंधित घटना 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी घडली आहे. यावेळी पीडित मालवडे आपलं दुकान बंद करून आपल्या वडिलांची वाट पाहात होते. दरम्यान त्याठिकाणी खडक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी पोहोचले. त्यांनी पीडित मालवडे या अंध तरुणाला कोणतंही कारण नसताना मारहाण केली. यामुळे मालवडे यांच्या पायाला आणि संपूर्ण शरीरावर मारहाण केल्याते व्रण आढळले आहे.

या घटनेची दखल घेत पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी कायदा हातात न घेण्याची ताकीदही त्यांनी यावेळी केली आहे. याप्रकरणी पीडित मालवडे याने पुणे मिररला सांगितलं की, मी संचारबंदीपूर्वी दुकान बंद केलं नव्हतं किंवा मी मास्क परिधान केला नव्हता, हा पोलिसांचा दावा पुर्णपणे खोटा आहे. मला डोळ्यांनी दिसत नसलं तरी मी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल पूर्णपणे जागरूक आहे. त्यांनी कोणतंही कारण न देता मला मारहाण केली आहे.

हे ही वाचा-सजग तरुणामुळे चिमुकलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका; असा उधळला डाव

याप्रकरणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि डीसीपी प्रियांका ननावरे यांनी सांगितलं की, पोलिसांकडून अंध तरुणाला झालेली मारहाण असमर्थनीय आहे. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित केलं जात आहे. त्याचबरोबर कोणत्याही नागरिकाला मारहाण न करण्याचा आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 5, 2021, 4:34 PM ISTSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW