Sunday, July 25, 2021
Homeक्रीडापृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटरवर डोपिंग विरोधात कडक कारवाई, चार वर्षांची...

पृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटरवर डोपिंग विरोधात कडक कारवाई, चार वर्षांची निर्बंधी | Anshula Rao Madhya Pradesh All Rounder became First Woman Cricketer to get Dope Banभारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉवर मागील वर्षी डोपिंग प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एका भारतीय क्रिकेटरवर डोपिंग विरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे.

पृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटरवर डोपिंग विरोधात कडक कारवाई, चार वर्षांची निर्बंधी

cricket image

नवी दिल्ली : खेळांमध्ये अनेकदा शॉर्टकट वापरण्याच्या नादात अनेक खेळाडू डोपिंगला बळी पडतात. स्टेरॉईड्‌स, स्टिम्युलंट्‌स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्‍स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड डोपिंग अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रात डोपिंग केले जाते. या सर्वांमुळे  शरीराची मोठी हाणी होत असली तरी असे प्रकार जगभरात केले जातात. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) देखील वर्षभरापूर्वी डोपिंगच्या प्रकरणात अडकला होता. त्यानंतर आता मध्य प्रदेशची अष्टपैलू क्रिकेटपटू अशुंला राव (Anshula Rao) ही देखील डोपिंग प्रकरणात अडकली असून असे करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

डोपिंग प्रकरणात अडकलेल्या पृथ्वी शॉवर आठ महिन्यांचा प्रतिबंध लावण्यात आला होता. ज्या पदार्थांच्या सेवनामुळे शॉवर कारवाई झाली होती त्याने ते पदार्थ खोकल्यावर औषध म्हणून खाल्ले असल्याचे सांगितले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा  नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (National Anti Doping Agency) नाडा (NADA) ने कडक कारवाई करत करत मध्य प्रदेशच्या अंशुलाला दोषी साबित केले आहे. त्यामुळे तिच्या खेळण्यावर 4 वर्षांचा निर्बंध ही लावण्यात आला आहे.

चाचणीनंतर दोषी सिद्ध

अंशुला रावने मध्‍यप्रदेश संघाचे बीसीसीआयद्वारा आयोजित अंडर-23 टी-20 टूर्नामेंटमध्ये प्रतिनिधित्‍व केले आहे. मात्र आता तिला ‘एनाबोलिक स्‍टीरॉयड 19-नोरैंड्रोस्‍टेरोन’ या पदार्थाचे सेवन करताना दोषी ठरवले गेले आहे. याधी 14 मार्च, 2020 मध्येही तिने याच पदार्थाचे सेवन केल्याचे आढळले होते. टाइम्‍स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अंशुलाचे सँपल चाचणीसाठी बेल्जियमला पाठवणयात आले. तेथील लॅबमध्ये अंशुलाने कोणत्याही वैद्यकीय कारणासाठी संबधित औषधं घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

हे ही वाचा :

स्मृती मंधानाला लग्नासाठी कसा मुलगा हवा?, चाहत्याच्या प्रश्नावर स्मृतीचं Cute उत्तर

VIDEO | सॅमसन ते पांड्या बंधू, क्रिकेटर्सची आवडती डिश Mock Duck, खुद्द शिखर धवनने दाखवली रेसिपी

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

(Anshula Rao Madhya Pradesh All Rounder became First Woman Cricketer to get Dope Ban)Source link

पृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटरवर डोपिंग विरोधात कडक कारवाई, चार वर्षांची निर्बंधी | Anshula Rao Madhya Pradesh All Rounder became First Woman Cricketer to get Dope Ban
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News