Tuesday, June 22, 2021
Homeमहाराष्ट्रबीसीसीआयने खेळाडूंना दिला कडक इशारा, आयपीएल खेळला नाहीत तर…

बीसीसीआयने खेळाडूंना दिला कडक इशारा, आयपीएल खेळला नाहीत तर…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

यंदाच्या आयपीएलमधील उर्वरीत सामने हे युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. पण हे सामने खेळण्यासाठी काही परदेशी खेळाडू तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. या खेळाडूंना आता बीसीसीआयने कडक इशारा दिला असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर बीसीसीआय या परदेशी खेळाडूंवर कडक कारवाई करणार असल्याचेही पुढे येत आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी इनसाइड स्पोर्टस या वृत्तसंस्थेला सांगितले की, ” जर परदेशी खेळाडू आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमध्ये खेळले नाहीत तर त्यांना पूर्ण मानधन मिळेलच असे सांगता येत नाही, त्यांचे मानधन हे प्रो-रेटा बेसवर करण्यात येणार आहे. कोणत्याही फ्रँचायझीला खेळाडूंच्या मानधनात कपात करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जे खेळाडू आयपीएलचे उर्वरीत सामने खेळणार नाहीत, त्यांच्याबाबत हा निर्णय घेतला जाऊ शकतो.”

आयपीएलमध्ये खेळाडूंना मानधन हे ३-४ हफ्त्यांमध्ये दिले जाते, त्यांना एकदाच मानधन दिले जात नाही. खेळाडूंच्या मानधनाचे ३-४ हिस्से केले जातात आणि त्यांना ते वेगवेगळ्या वेळी दिले जातात. खेळाडूंना पहिला हफ्ता हा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मिळतो. आयपीएल संपल्यावर त्यांना दुसरा हफ्ता दिला जातो, तर वर्षाच्या अखेरीस त्यांना आपल्या मानधानाचा तिसरा हफ्ता मिळत असतो.

आयपीएलला मोठा धक्का, बीसीसीआयची चिंता वाढली…

आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय आता बीसीसीआयने घेतला आहे. पण आता युएईच्या सरकारने एक नवीन नियम बनवला आहे. त्यामुळे आयपीएलला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. युएईच्या सरकारने आता एक नवीन नियम बनवला आहे. त्यांना आता रेड लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार या लिस्टमध्ये काही देशांचा समावेश करण्यात आला आहे. या लिस्टमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आबुधाबीच्या आरोग्य मंत्रालयाने आता भारतीयांच्या प्रवेशावर आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे आता आयपीएल युएईमध्ये कसे खेळवायचे, हा मोठा प्रश्न बीसीसीआयपुढे असेल. त्यामुळे आता बीसीसीआयला आयपीएलसाठी दुसरा देश पाहावा लागणार आहे का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW