Sunday, July 25, 2021
Homeपुणेबोगस लसीकरण करणाऱ्यांपैकी एका आरोपीला बारामतीमधून अटक करण्यात आली | Coronavirus-latest-news

बोगस लसीकरण करणाऱ्यांपैकी एका आरोपीला बारामतीमधून अटक करण्यात आली | Coronavirus-latest-news


Fake Vaccination: मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्याला बारामतीतून अटक

Fake Covid Vaccination case: मुंबईत झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. ही अटक बारामतीमधून करण्यात आली आहे.

बारामती, 30 जून: मुंबईत झालेल्या बोगस लसीकरण (Mumbai Fake Vaccination) प्रकऱणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. ही अटक पुणे जिल्ह्यातील बारामती (Accused arrest from Baramati) येथून करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेश पांडे असे असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी राजेश याने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोविडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण केलं होतं. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे नागरिकांना प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती.

आरोपी राजेश पांडे याला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉज वरून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यावर मुंबईतील कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीकडे रवाना झाली आहे. लवकरच आरोपीला मुंबईत आणले जाणार आहे.

विनामास्क फिरणाऱ्याला हटकले; संतापाच्या भरात पोलिसांवरच हल्ला करत घेतला चावा, NSG कमांडो असल्याचा करतोय दावा

काय आहे संपूर्ण प्रकरण

30 मे 2021 रोजी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरण करण्यात आले होते. सोसायटीमधील 390 सदस्यांकडून प्रत्येकी 1260 रुपये घेत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून नागरिकांची फसवणूक केलेली 12,40,000 रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. तसेच एक कारही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि मनिष त्रिपाठी यांची बँक खाते गोठवण्यात आली आहेत.


Published by:
Sunil Desale


First published:
June 30, 2021, 11:43 PM IST





Source link

बोगस लसीकरण करणाऱ्यांपैकी एका आरोपीला बारामतीमधून अटक करण्यात आली | Coronavirus-latest-news
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News