Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाभर मैदानात खेळाडूने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, प्रेक्षकांनीही दिली साथ, पाहा व्हिडीओ...

भर मैदानात खेळाडूने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, प्रेक्षकांनीही दिली साथ, पाहा व्हिडीओ | Major Soccer Leagues Minnesota FC Player Hassani Dotson Stephenson Proposed his Girlfriend Petra Vukovic in the Football Groundखेळाच्या मैदानावर कधीकधी खेळाशिवाय इतरही गोष्टी होतात. ज्या पाहून प्रेक्षकांसह खेळाडूही चक्रावून जातात. काही सुखद धक्के देणाऱ्या गोष्टी पाहून सर्वांनाच बरे वाटते. अशीच काहीशी गोष्ट अमेरिकेतील एका फुटबॉल मैदानावर घडली असून एका नामांकित लीगमधील खेळाडूने त्याच्या प्रियसीला भर मैदानात प्रपोज केला आहे.

भर मैदानात खेळाडूने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, प्रेक्षकांनीही दिली साथ, पाहा व्हिडीओ

Footballed proposed at ground

वॉशिग्टंन : खेळाचं मैदान म्हटलं की तिथे चुरस, स्पर्धा, वाद-विवादासह अनेकदा काही प्रेमळ मन जिंकणाऱ्या घटनाही पाहायला मिळतात. कधी कधी दोन प्रतिस्पर्धी चुरशीच्या सामन्यानंतर एकमेंकाना सावरताना दिसतात. तर कधी सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूला दुखापत झाल्यावर खेळाडू एकमेंकाना मदतही करतात. असे व्हिडीओ पाहून प्रत्येकालाच बरं वाटतं. असाच एक व्हिडीओ समोर आला असून अमेरिकन फुटबॉल लीग अर्थात मेजर लीग सॉकरमधील (Major soccer league) एका खेळाडूने भर मैदानात आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं.  मिनेसोटा फुटबॉल क्लब (Minnesota FC) आणि सॅन जोस अर्थक्वेक (San Jose Earthquakes) यांच्यातील सामन्यात ही घटना घडली. मिनेसोटा संघाच्या हसानी डॉटसन स्फेन्सन (Hassani Dotson Stephenson) याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आणि तिनेही त्याचा प्रस्ताव मान्य करत संपूर्ण मैदानासमोरच त्याला मिठी मारली. (Major Soccer Leagues Minnesota FC Player Hassani Dotson Stephenson Proposed his Girlfriend Petra Vukovic in the Football Ground)

हा संपूर्ण व्हिडीओ इन्स्टाग्रामवर स्फेन्सनने पोस्ट केला आहे. या व्हिडीओत स्फेन्सन एका गुडघ्यावर बसून गर्लफेंड पेट्रा वुकोविचला प्रपोज करतो. तो तिच्यासमोर अंगठी ठेवत तिला प्रपोज करतो. हे पाहताच संपूर्ण मैदानही टाळ्यांचा वर्षाव करु लागते. आश्चर्यचकीत झालेली पेट्रा देखील लगेचच प्रपोज मान्य करत स्फेन्सनला मिठी मारते. दोघांना पाहून संपूर्ण मैदानातील प्रेक्षक टाळ्या वाजवत असतात.

इंस्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओला स्फेन्सनने स्वत: पोस्ट केले असून हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव या व्हिडिओवर होत आहे. दरम्यान स्फेन्सनने व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन दिले आहे की, “माझ्या मनाला झालेल्या आनंदाला शब्दात सांगता येईल असे शब्द माझ्याकडे नाहीत. तुझं प्रेम मिळण माझ्यासाठी खूप खास आहे. तुम्हा सर्वांच्या शुभकामनांसाठी धन्यवाद. माझ्या आयुष्यातील हे क्षण यादगार करण्यासाठी सर्वांचे मनापासून आभार.”

हे ही वाचा :

Video : एम एस धोनीला आहे झोपेत बोलण्याची सवय, पत्नी साक्षीने केला खुलासा, नेमक काय बोलतो माही?

Euro 2020 : युक्रेनला मात देत इंग्लंड विजयी, चेक रिपब्लिकला नमवत डेन्मार्कही सेमीफायनलमध्ये दाखल

महेद्रसिंह धोनीच्या घरी नवी पाहुणी, लग्नाच्या वाढदिवसादिवशी पत्नी साक्षीने दिली माहिती, फोटोही केला पोस्ट

(Major Soccer Leagues Minnesota FC Player Hassani Dotson Stephenson Proposed his Girlfriend Petra Vukovic in the Football Ground)

Source link

भर मैदानात खेळाडूने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, प्रेक्षकांनीही दिली साथ, पाहा व्हिडीओ | Major Soccer Leagues Minnesota FC Player Hassani Dotson Stephenson Proposed his Girlfriend Petra Vukovic in the Football Ground
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News