Thursday, June 17, 2021
Homeमुंबईमहात्मा फुले मंडईला आग , छत भस्मसात; मध्यरात्री उडाला भडका, जीवितहानी नाही

महात्मा फुले मंडईला आग , छत भस्मसात; मध्यरात्री उडाला भडका, जीवितहानी नाही


वृत्तसंस्था

पुणे : पुण्यातील ब्रिटिश कालीन महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीचे नेमके कारण समजलेले नाही. या आगीमध्ये जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. Mahatma Phule Mandai got In Fire

अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई ही ब्रिटिश कालीन वास्तू आहे. आतील बहुतांश भाग हा लाकडी आहे. आगीमुळे काही भागाचे नुकसान झाले आहे.

रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी पोचले. मात्र तोपर्यंत आतील काही भाग जळून खाक झाला होता. अग्निशामन दलाच्या तीन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, अशी माहिती अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Mahatma Phule Mandai got In Fire

महत्त्वाच्या बातम्याSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW