Sunday, July 25, 2021
Homeक्रीडामहेद्रसिंह धोनीच्या घरी नवी पाहुणी, लग्नाच्या वाढदिवसादिवशी पत्नी साक्षीने दिली माहिती, फोटोही...

महेद्रसिंह धोनीच्या घरी नवी पाहुणी, लग्नाच्या वाढदिवसादिवशी पत्नी साक्षीने दिली माहिती, फोटोही केला पोस्ट | Indian Former Cricketer MS Dhoni Gifts Vintage Car to Wife Sakshi Dhoni on 11th Wedding Anniversaryभारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असणारा महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakashi Dhoni) यांच्या लग्नाचा आज (4 जुलै) 11 वा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी 2010 मध्ये हे दोघेहीलग्नबंधनात अडकले होते.

महेद्रसिंह धोनीच्या घरी नवी पाहुणी, लग्नाच्या वाढदिवसादिवशी पत्नी साक्षीने दिली माहिती, फोटोही केला पोस्ट

महेद्रसिंह धोनी फॅमिली

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. माहीच्या लग्नाला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान याचेच औचित्य साधत महेंद्र सिंह धोनीने पत्नी साक्षी धोनीला (Sakshi Dhoni) एक शानदार विंटेज कार गिफ्ट दिली आहे. साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कारचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवरही कारचा फोटो ठेवला होता. धोनीला थँक्यू म्हणत साक्षीने ही पोस्ट केली होती. ही कार जुन्या काळातील असल्यामुळे नेमकी कंपनी आणि मॉडेल अजून स्पष्ट झालेले नाही.

साक्षीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच स्टोरी पोस्ट केल्या असून यात त्यांच्या मित्रपरिवाराने दिलेल्या शुभेच्छांच्या पोस्ट होत्या. धोनी एक बाईक शौकीन असल्याचे सर्वांना माहित आहे. पण त्याला कार्सचा ही शौक असल्याने त्याच्याकडे अनेक कार्स आहेत.  2019 मध्ये धोनीने जीप कंपनीची ग्रँड चेरोकी ट्रेकहॉक ही कार खरेदी केली होती. जीची किंमत दीड कोटीच्या आसपास होती.

Dhoni gift car

धोनीने गिफ्ट केलेली विंटेज कार

अनेक लग्जरी कार्सचा मालक आहे धोनी

2020 या वर्षी ट्रांस-एएम सीरीज की कार ही धोनीने खरेदी केली होती. ही कार मूळ रुपाने अमेरिकेत रेसिंगसाठी वापरली जाते.  70 लाखांच्या आसपास या कारची किंमत आहे. धोनीकडे Porche 911, Ferrari 599 GTO, Hummer H2, निसान जोंगा, लँड रोवर फ्रीलँडर 2 आणि ऑडी क्यू7 सारख्या बऱ्याच लग्जरी कार्स आहेत.

हे ही वाचा :

Photo : महेद्रसिंह धोनी आणि साक्षीच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, अशी झाली होती पहिली भेट, सिनेमापेक्षा वेगळी आहे धोनीची प्रेमकहाणी

Video : धोनीचं फार्म हाऊस, पाळीव प्राण्यांसह फळा-फुलांचा खजिना

आयपीएलच्या उर्वरित सामन्यात MS Dhoni धमाका करेल, चेन्नईच्या खेळाडूची भविष्यवाणी

(Indian Former Cricketer MS Dhoni Gifts Vintage Car to Wife Sakshi Dhoni on 11th Wedding Anniversary)

Source link

महेद्रसिंह धोनीच्या घरी नवी पाहुणी, लग्नाच्या वाढदिवसादिवशी पत्नी साक्षीने दिली माहिती, फोटोही केला पोस्ट | Indian Former Cricketer MS Dhoni Gifts Vintage Car to Wife Sakshi Dhoni on 11th Wedding Anniversary
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News