Tuesday, June 22, 2021
Homeमुंबईमोदी – योगी भेट; सौजन्याच्या गाठीभेटींचा राजकीय सिलसिला आजही तेजीत

मोदी – योगी भेट; सौजन्याच्या गाठीभेटींचा राजकीय सिलसिला आजही तेजीत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातल्या कोविड आणि राजकीय परिस्थितीची कल्पना पंतप्रधानांना दिली. मोदी विरूध्द योगी हा ट्रेंड सोशल मीडियावर चालविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर योगींनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आता योगी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आले आहेत. Uttar Pradesh CM Yogi Adityanath meets Prime Minister Narendra Modi at his official residence in New Delhi

योगी काल राजधानीत दाखल होताच सौजन्य गाठीभेटींचा सिलसिला तेजीत आला होता. योगींनी आज दिल्लीत दाखल झाल्या – झाल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

ही भेट आटोपून योगी उत्तर प्रदेश भवनात दाखल होताच भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले काँग्रेसचे तरूण नेते जितीन प्रसाद यांनी योगींची भेट घेतली. योगीजी दिल्लीत आल्यामुळे आपण त्यांची सौजन्य भेट घेतल्याचे जितीन प्रसाद यांनी उत्तर प्रदेश भवनातून बाहेर पडताना सांगितले.

इकडे योगी – जितीन प्रसाद यांची भेट होत असतानाच उत्तर प्रदेशातील अपना दल पक्षाच्या नेत्या अनुप्रिया पटेल या गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. अमित शहांची भेट घेऊन चर्चा केल्याचा फोटो अनुप्रियांनी ट्विट केला.

उत्तर प्रदेश भाजपमध्ये असलेली कथित अस्वस्थता, मोदी विरूध्द योगी असे चालविण्यात आलेले ट्विटर वॉर, योगी मंत्रिमंडळातला संभाव्य फेरबदल आणि विस्तार तसेच राज्यात २०२२ च्या सुरूवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणूका या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या सौजन्यपूर्ण गाठीभेंटीना राजकीय महत्त्व आले आहे.

उत्तर प्रदेशातले समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांनी अद्याप आपापली राजकीय समीकरणे जुळवायला सुरूवात करण्यापूर्वी भाजप स्वतःची राजकीय समीकरणे जुळवायला लागला असल्याचे या गाठीभेटींमधून दिसून येते आहे आणि यामध्ये सुरूवातीपासूनच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे दोन्ही नेते लक्ष घालायला लागल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Uttar Pradesh CM Yogi Adityanath meets Prime Minister Narendra Modi at his official residence in New Delhi

महत्त्वाच्या बातम्या

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW