…म्हणून जयंत पाटील यांनी रद्द केली राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा – corona restrictions nanded jayant patil cancels ncps pariwar samvad yatra

0
21


हायलाइट्स:

  • जयंत पाटलांचा मोठा निर्णय
  • राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा रद्द
  • करोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

नांदेड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) हे गेल्या काही दिवसांपासून परिवार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पाटील यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लादण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे जयंत पाटील यांनी या यात्रेतील पुढील कार्यक्रम रद्द केले आहेत.

परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने सध्या नांदेडमध्ये असलेल्या जयंत पाटील यांचा पुढे हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि औरंगाबाद असा दौरा होता. मात्र उद्यापासून त्यांचा पुढील दौरा रद्द करण्यात आला आहे.

...म्हणून जयंत पाटील यांनी रद्द केली राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा - corona restrictions nanded jayant patil cancels ncps pariwar samvad yatrabjp criticizes congress leaders: काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू; ओबीसी आरक्षणावरून भाजपचा निशाणा

शिवसेना, काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा?

आगामी विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असला तरीही बहुतांश राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीही स्वबळाचीच तयारी करणार का, अशी चर्चा सुरू आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी निवडणुका आघाडीतच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आमचा स्वबळावरचा कोणताही विचार नाही. तिन्ही पक्षांनी एकत्रित रहावं, अशी आमची भावना असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

ईडी चौकशीवरून भाजपला फटकारलं!

राज्य सरकारमध्ये सामील असणाऱ्या पक्षांतील विविध नेत्यांच्या ईडी चौकशीवरून जयंत पाटील यांनी केंद्रातील सत्ताधारी असणाऱ्या भाजपवर टीका केली आहे. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रकार भाजपाने सुरू केला आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईबाबत जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘महाविकास आघाडीतील मंत्र्यांना आणि आमदारांना धमक्या देऊन केंद्रीय एजन्सीचा गैरवापर भाजपकडून सुरू आहे. एनआयएकडून मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास करण्याऐवजी अटकेत असलेल्या व्यक्तीकडून काही वदवून घेऊन राजकारणातील व्यक्तीला त्रास देण्याचा नवा प्रकार सुरू आहे. या देशातल्या लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू झाले आहे,’ असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला आहे.Source link