Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडायूएईमध्ये सामने, मात्र आयोजनाचे अधिकार भारताकडेच, T20 वर्ल्डकपसंदर्भात मोठा निर्णय, पाहा शेड्यूल.......

यूएईमध्ये सामने, मात्र आयोजनाचे अधिकार भारताकडेच, T20 वर्ल्डकपसंदर्भात मोठा निर्णय, पाहा शेड्यूल…. | T 20 World Cup 2021 in UAE ICC Soon Dates Announcedकित्येक आठवड्यांपासूनचे अंदाज, शंका-कुशांका आणि अटकळीनंतर आता या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. भारतात होणारी ही स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये आयोजित केली जाईल. (T 20 World Cup 2021 in UAE ICC Soon Dates Announced)

यूएईमध्ये सामने, मात्र आयोजनाचे अधिकार भारताकडेच, T20 वर्ल्डकपसंदर्भात मोठा निर्णय, पाहा शेड्यूल....

ICC T20 World Cup

मुंबई : कित्येक आठवड्यांपासूनचे अंदाज, शंका-कुशांका आणि अटकळीनंतर आता या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आयसीसी टी -20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. भारतात होणारी ही स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये आयोजित केली जाईल. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपली सहमती दर्शविली असून बोर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) याबाबतची माहिती देणार आहे. युएईमध्ये जरी ही स्पर्धा खेळली गेली असली तरी आयोजनाचे सगळे अधिकार बीसीसीआयकडेच आहेत. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. (T 20 World Cup 2021 in UAE ICC Soon Dates Announced)

बीसीसीआयचं ठरलं!

भारतातील कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे विश्वचषकावर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं होतं. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भारतीय नियामक मंडळाने या महिन्यात आयसीसीकडे थोडा वेळ मागितला होता आणि 28 जूनपर्यंत बीसीसीआयला निर्णयाची माहिती आयसीसीला द्यावी लागणार होती. आता बीसीसीआयने आपला निर्णय ठरविला असून सुमारे एक महिना चालणारा हा विश्वचषक आता युएईमध्ये खेळला जाईल.

आयसीसीकडून लवकरच तारखांच्या घोषणा

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एएनआयला सांगितले की, बीसीसीआय आज आयसीसीला आपल्या निर्णयाबद्दलची माहिती देईल. शाह म्हणाले, “आम्ही आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सांगू की आम्ही टी -20 विश्वचषक युएईमध्ये घेत आहोत. तारखांबाबत आयसीसी निर्णय घेईल.”

शेड्यूल कसं असणार?

पहिल्या राऊंडमध्ये 8 संघांदरम्यान 12 सामने खेळविले जातील. यामधून चार संघ सुपर 12 साठी क्वालिफाय करतील. आठमधल्या चार टीम अव्वल 8 रँकिंगमध्ये सामिल होऊन सुपर 12 मध्ये पोहोचतील. (बांगलादेश, आर्यलंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी)

यानंतर 12 संघात एकूण 30 सामने खेळले जातील. जे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरु होतील. सुपर 12 दोन विभागांमध्ये (सहा-सहा) विभाजित केल्या जातील. या मॅचेस तीन ठिकाणी होतील. दुबई अबूधाबी आणि शारजाहला मॅचेस खेळविण्याचा नियोजन होतील. यानंतर तीन नॉक आऊट सामने होतील. दोन सेमी फायनल आणि एक फायनल…!

WTC अंतिम सामन्यात पराभव, टी ट्वेन्टी स्पर्धेत काय होणार?

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसीची एकही स्पर्धा भारताने जिंकलेली नाही. अगदी टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, एकदिवसीय वर्ल्डकप, WTC… या तीन संधी भारताच्या हाती होत्या… पण कोणत्या ना कोणत्या कारणाने जेतेपदाने भारताला हुलकावणी दिली. भारताचा नुकताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडने दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे येत्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा असतील.

(T 20 World Cup 2021 in UAE ICC Soon Dates Announced)

हे ही वाचा :

मोठी बातमी : T-20 वर्ल्ड कप भारतात होणार नाही, ‘या’ लोकप्रिय देशात ऑक्टोबरपासून थरार रंगणार!, पाहा शेड्यूल…Source link

यूएईमध्ये सामने, मात्र आयोजनाचे अधिकार भारताकडेच, T20 वर्ल्डकपसंदर्भात मोठा निर्णय, पाहा शेड्यूल.... | T 20 World Cup 2021 in UAE ICC Soon Dates Announced
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News