योगगुरू रामदेव बाबा ; औषध माफियांच्या विरोधात लढाई असल्याचा दावा yoga guru Ramdev Baba said he will take vaccine

0
34


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एलोपॅथिक सायन्सवर टीका करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांनी आता कोरोनाविरोधी लस घेणार असल्याचं सांगितलं आहे. सर्वांनी लस घ्यावी तसेच आयुर्वेद आणि योगाचा अभ्यास करावा, असा सल्ला दिला आहे. Yoga guru Ramdev Baba said he will take vaccine

काही दिवसांपूर्वी रामदेव बाबा यांनी एलोपॅथि सायन्सवर टीका करून वाद निर्माण केला होता. प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेले होते. तेव्हा रामदेव बाबा यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे न्यायालयाने सांगितले होते.रामदेव बाबा म्हणाले की, “आमचे कोणत्याही संघटनेशी शत्रूत्व नाही. सर्व चांगले डॉक्टर म्हणजे या पृथ्वीवर पाठवलेले देवाचे दूत आहेत. आमचा लढा हा डॉक्टरांच्या विरोधात नसून औषधं माफियांच्या विरोधात आहे.”

ते म्हणाले की, “औषधांच्या नावाखाली कोणाची फसवणूक होऊ नये आणि लोकांना अनावश्यक औषधं देऊ नयेत. सर्जरी आणि आपत्कालीन स्थितीमध्ये  एलोपॅथी हे सर्वात चांगले आहे.”

yoga guru Ramdev Baba said he will take vaccineSource link