राज्यभर घरफोड्या करणाऱ्या टोळीतील म्होरक्या गजाआड – buldana leader of a gang of robbers arrested

0
26


हायलाइट्स:

  • राज्यभर धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या अटकेत
  • बुलडाण्यातील घटनेनंतर पोलिसांनी फिरवली चक्र
  • जालना येथून कुख्यात संजूसिंग कृष्णासिंग भादा याला घेतलं ताब्यात

बुलडाणा : घरफोड्या आणि जबरी चोऱ्यांमध्ये राज्यभरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा प्रमुख म्होरक्या कुख्यात संजूसिंग कृष्णासिंग भादा (वय २५) याला खामगाव पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी पहाटे गुरूगोविंदसिंग कॉलनी जालना येथील घरातून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी खामगावात दोन दिवसांपूर्वी चोरींच्या घटनांमध्ये वापरलेली तवेरा गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.

संजूसिंग कृष्णासिंग भादा याच्या टोळीवर राज्यभरात दरोडे, चोऱ्या, फसवणूक आणि लुटीचे एकूण २८ गुन्हे दाखल असल्याचे समोर आलं आहे.

राज्यभर घरफोड्या करणाऱ्या टोळीतील म्होरक्या गजाआड - buldana leader of a gang of robbers arrestedपुण्यातील बिजवडीत तरुणाची आत्महत्या

दोन दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील तुळजाई मेडिकल व लाईफ लाईन हॉस्पिटलमधील सुभाष मेडिकल इथं २१ जून रोजी रात्री लुटीची घटना घडली होती. दरोडेखोरांनी तवेरा गाडीतून येऊन कुलूप तोडून दोन्ही मेडिकलमधून एकूण ३ लाख २० हजाराची चोरी केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान शहर पोलिसांनी संजूसिंग कृष्णासिंग भादा याला गुरूगोविंदसिंग कॉलनी जालना येथून ताब्यात घेण्यात आलं. या टोळीतील इतर आरोपींना अटक होणे बाकी आहे. या टोळीवर राज्यभरात दरोडे, चोऱ्या, जबरी चोऱ्या, फसवणूक आणि लुटीचे चाळीसगाव शहरात (जळगाव जिल्हा), औरंगाबाद शहर, वाशिम शहर, नागपूर ग्रामीण, धुळे, जालना, बुलडाणा आदी शहरात एकूण २८ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या कुख्यात दरोडेखोराला अटक केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.Source link