Tuesday, June 22, 2021
Homeपुणेलष्कर भरती पेपर लीक प्रकरणात लेफ्टनंट कर्नलला अटक; गुन्ह्याची व्याप्ती परराज्यात पसरल्याचा...

लष्कर भरती पेपर लीक प्रकरणात लेफ्टनंट कर्नलला अटक; गुन्ह्याची व्याप्ती परराज्यात पसरल्याचा संशय | Crime


लष्कर भरती पेपर लीक प्रकरणात लेफ्टनंट कर्नलला अटक; गुन्ह्याची व्याप्ती परराज्यात पसरल्याचा संशय

काही दिवसांपूर्वी लष्कर भरतीचा पेपर फुटल्याची (army recruitment paper leak case) खळबळजनक घटना समोर आली होती. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी लेफ्टनंट कर्नलला अटक (Lieutenant colonel arrested) केली आहे.

पुणे, 04 जून: काही दिवसांपूर्वी लष्कर भरतीचा पेपर फुटल्याची (army recruitment paper leak case) खळबळजनक घटना समोर आली होती. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी लेफ्टनंट कर्नलला अटक (Lieutenant colonel arrested) केली आहे. संबंधित आरोपी कर्नलला न्यायालयात हजर केलं असता, विशेष न्यायाधिश ए. वाय. थत्ते यांनी आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. लष्कर पेपर फुटी गुन्ह्याची व्याप्ती कितपत आहे, याचा तपास वानवडी पोलिसांकडून केला जात आहे.

संबंधित अटक केलेल्या आरोपी लेफ्टनंट कर्नलचं नाव भगत प्रितसिंग सरताजसिंग बेदी (वय – 44) असून तो आंध्रप्रदेशातील सिकंदराबाद येथील रहिवासी आहे. आरोपी कर्नल लेखी परीक्षेच्या प्रिटींग कमिटीचा प्रिसायडिंग अधिकारी होता. त्याने लष्कर भरतीचा लेखी पेपर चोरून काही जणांना पैशाच्या बदल्यात हा पेपर विकला होता. पोलिसांनी आरोपीच्या सिकंदराबाद येथील घरातून संबंधित प्रश्नपत्रिका जप्त केली होती. या प्रश्नपत्रिकेत एकूण 50 प्रश्न आणि त्याचे पर्याय उपलब्ध होते.

त्याचबरोबर आरोपीच्या मोबाइलमध्ये या प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळले आहेत. आरोपीने हे सर्व फोटो आपल्या पत्नीच्या मोबाइलमध्ये साठवून ठेवले होते. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपीच्या पत्नीचा काही सहभाग आहे का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. पेपर फोडण्यासाठी आरोपी कर्नलला तीन लाख रुपये मिळाले होते. त्यातील दीड लाख रुपये पोलिसांनी जप्त केले असून उर्वरित पैशाचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा-‘…अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही’; स्पीड पोस्टद्वारे 20 लाखाच्या खंडणीची मागणी

लष्कर भरतीचा हा पेपर केवळ महाराष्ट्रातचं फुटला नसून अन्य राज्यातही या गुन्ह्याची व्याप्ती पसरलेली असू शकते, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी आरोपील अटक केली असून पोलीस कोठडीत आरोपीची चौकशी केली जात आहे. आणखी बरीच माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.


Published by:
News18 Desk


First published:
June 4, 2021, 12:07 PM ISTSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW