Thursday, June 17, 2021
Homeमहाराष्ट्र'वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची'; राऊतांचा भाजपला टोला

'वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची'; राऊतांचा भाजपला टोला'वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची'; राऊतांचा भाजपला टोला

नाशिकः ‘ वाघाशी मैत्री करायला तयार आहे असं म्हणतात. पण वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची’, असा खोचक टोला शिवसेनेचे खासदार यांनी भाजपला लगावला आहे.

संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. मोदींनी आदेश दिल्यास आम्ही वाघाशी मैत्री करायला तयार आहोत, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. ‘चंद्रकांत दादा गोड माणूस आहे, त्यांनी गोड खावं, गोड बोलावं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,’ असा उपरोधित टोला राऊतांनी लगावला आहे.

‘नरेंद्र मोदी हे भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांच्यामुळं भाजपला मोठे यश मिळाले आहे. पंतप्रधान कोणीही असो त्यांनी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करू नये देशाचा प्रचार करावा. ते देशाचे पंतप्रधान आहे कार्यकर्त्यांचे त्यांच्यावर प्रेम असतं. फोटो वापरणे हे त्यांच्यावर असतं. लोकांच्या मनात नेता असतो,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘सत्ता महत्त्वाची नाही, संघटना महत्त्वाची आहे म्हणूनच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहोत. मनपा, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. विधानसभेत १०५चे दावे सुरु आहेत. तसं आम्हीही १००च्या पुढची तयारी करतोय,’ असा विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केला

‘संघटनेचे दौरे होत असतात, सर्वच नेते दौरे करतात. करोना संकटामुळं बाहेर निघू शकत नव्हतो. पदाधिकारी ना मुंबईत बोलवता येत नव्हतं म्हणून आम्हीच जाऊन भेटत आहोत. या आधी पश्चिम महाराष्ट्र दौरा झाला आता उत्तर महाराष्ट्र दौरा करत आहोत,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW