Thursday, July 29, 2021
Homeक्रीडा'हा' धुरंदर भारतीय क्रिकेटपटू पोहोचला फुटबॉल सामना पाहण्यासाठी, जर्मनी विरुद्ध इंग्लंड मॅचचा...

‘हा’ धुरंदर भारतीय क्रिकेटपटू पोहोचला फुटबॉल सामना पाहण्यासाठी, जर्मनी विरुद्ध इंग्लंड मॅचचा घेतला आनंद | Rishabh Pant spotted at Stadium watching England vs Germany Euro 2020 matchभारतीय खेळाडू क्रिकेट सामन्यापूर्वी सरावादरम्यान अनेक खेळ खेळत असतात. यात अनेकदा खेळाडू फुटबॉल खेळताना दिसतात. दरम्यान एक भारताचा युवा खेळाडूला फुटबॉल हा खेळ इतका आवडतो की तो थेट युरो चषकाचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक बनून मैदानात पोहोचला आहे.

'हा' धुरंदर भारतीय क्रिकेटपटू पोहोचला फुटबॉल सामना पाहण्यासाठी, जर्मनी विरुद्ध इंग्लंड मॅचचा घेतला आनंद | Rishabh Pant spotted at Stadium watching England vs Germany Euro 2020 match

रिषभ पंत

लंडन : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये थांबला आहे. दरम्यान कसोटी मालिकेला बराच वेळ असल्याने सर्व खेळाडू सध्या विश्रांती घेत आपल्या परिवार किंवा मित्रांसोबत वेळ घालवत आहेत. प्रत्येकजण सोशल मीडियावर भटकंतीचे फोटो शेअर करत असताना एक क्रिकेटपटू थेट युरो चषकातील इंग्लंड विरुद्ध जर्मनी यांच्यातील फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी लंडनच्या विम्बली मैदानात पोहोचला आहे. (Rishabh Pant spotted at Stadium watching England vs Germany Euro 2020 match)

तर हा धुरंदर भारतीय क्रिकेटपटू म्हणजे युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत असून तो मंगळवारी युरो चषकातील (Euro Cup 2020) बाद फेरीचा इंग्लंड विरुद्ध जर्मनी (England vs Germany) सामना पाहण्यासाठी वेम्बली स्टेडियमवर गेला होता. पंतने आपल्या मित्रांसह स्टेडियममध्ये फोटोही काढले जे त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोजना ‘हा सामना पाहण एक चांगला अनुभव होता’ असं कॅप्शनही पंतने दिलं आहे.

14 जुलैला पुन्हा एकत्र येणार भारतीय संघऐ

WTC final मध्ये पराभवाची निराशा दूर करण्यासाठी सर्व संघ आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवत आहे. दरम्यान ही सुट्टी संपवून 14 जुलैला सर्व संघाला एकत्र लंडनमध्ये जमाव लागणार आहे. तेथून इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी सर्व संघ नॉटिंघमला रवाना होईल. इंग्लंड विरुद्धची 5 कसोटी सामन्यांची सिरीज ही 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे से होगी.

हे ही वाचा :

Euro 2020 : बाद फेरीचे सामने संपले, आता 8 अंतिम संघामध्ये रंगणार युद्ध, वाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे

कचरा केला म्हणून माजी भारतीय क्रिकेटपटूला दंड, गोव्याच्या एका गावातील प्रकार

(Rishabh Pant spotted at Stadium watching England vs Germany Euro 2020 match)Source link

'हा' धुरंदर भारतीय क्रिकेटपटू पोहोचला फुटबॉल सामना पाहण्यासाठी, जर्मनी विरुद्ध इंग्लंड मॅचचा घेतला आनंद | Rishabh Pant spotted at Stadium watching England vs Germany Euro 2020 match
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News