Monday, June 21, 2021
Homeपुणेहे सरकार झोपेत असताना पडेल असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी...

हे सरकार झोपेत असताना पडेल असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं | Pune


हे सरकार झोपेत असताना पडेल असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं | Pune

Ajit Pawar on Maharashtra Government: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 4 जून: राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असलेलं राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कधीही पडेल असं वक्तव्य वारंवार भाजप नेते करत असतात. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही असं वक्तव्य करत म्हटलं होतं की, राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहेत. एक दिवस सर्वजण झोपेत असतील तेव्हा हे सरकार गेलेलं असेल. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

पुण्यात कोरोना स्थिती संदर्भातील आढावा बैठक संपल्यावर पत्रकारांसोबत अजित पवारांनी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, “हे सरकार झोपेत असताना पडेल असं चंद्रकांत पाटील म्हटले तेंव्हापासून मी सारखा झोपेतून जागा होतो आणि बघतो सरकार आहे का पडलं.” यानंतर अजित पवार पुढे म्हणाले, कुणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही.

यापूर्वी सुद्धा अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर भाष्य करत म्हटलं होतं की, महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर अजित पवार म्हणाले होते की, चंद्रकांत पाटील हे जोपेत असताना बोलले असतील.

अजितदादा, झोपेत सरकार तुम्हीच आणलं, सांभाळून बोला, चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा

अजितदादांना प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटील झोपेत बोलले असतील असं वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांना चंद्रकांत पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. चंद्रकांत पाटील म्हणाले होते, उभ्या उभ्या किंवा झोपेत मी बोलत नाही. अजितदादा झोपेत सरकार तुम्हीच आणलं होतं. शपथविधीला तुम्हाला काय तलवारीच्या धाकावर नेलं नव्हतं. तीन दिवसांचे भाजप सरकार स्थापन केले होते त्यावेळी मांडीला मांडी लावून बसला होता. त्यावेळी शरद पवार हेही झोपेत होते. पण 28 आमदार माघारी फिरले, यामध्ये अजितदादांचा काय दोष आहे. अजित पवारांनी मागे काय केलं ते आठवलं पाहिजे.


Published by:
Sunil Desale


First published:
June 4, 2021, 9:08 PM ISTSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW