23 village in pune: पुणे पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा – deputy cm ajit pawar share development plan for the merged 23 villages

0
39


हायलाइट्स:

  • पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश
  • पुणे ठरली सर्वात मोठी महापालिका
  • अजित पवारांनी केली मोठी घोषणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर या गावांतील काही जागा म्हाडाकडून ताब्यात घेऊन त्या ठिकाणी नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली.राज्य सरकारकडून या २३ गावांचा योजनाबद्ध विकास केला जाणार असून पुणेकरांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) दोन हजार ९०८ सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीने ऑनलाइन सोडत पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे आणि म्हाडाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने- पाटील उपस्थित होते.

वाचाः मराठा आरक्षणः पुनर्विचार याचिका फेटाळली; संभाजीराजेंनी सुचवले पर्याय

‘राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. पुणे शहर हे देशामध्ये अव्वल स्थानावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या गावांचा योजनाबद्ध विकास केला जाणार आहे. त्यासाठी पुणेकरांनी साथ द्यावी, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या हद्दीमध्ये म्हाडाकडून काही जागा ताब्यात घेतल्या जातील. त्या ठिकाणी नागरिकांसाठी स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येतील’ असेही पवार म्हणाले. लॉटरीमधील विजेत्यांना तातडीने घरांचा ताबा देण्यात यावा, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.

वाचाः प्रत्येक शिपाई निवृत्तीपर्यंत पीएसआय होणार; ‘अशी’ आहे योजना

गैरसमज पसरवू नका

करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांच्या उपस्थितीत वारी करण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविल्याबद्दल वारकरी संप्रदायाचे आभार व्यक्त करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी केल्यावर २३ लोक हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्य चालवित असताना काही नियम आणि मर्यादा घालाव्या लागत आहेत. नागरिकांचा हिरमोड करण्याची राज्य सरकारची भावना नाही. मात्र, काहीजण वेगवेगळे सांगून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोणीही गैरसमज पसरवू नये’

वाचाः लोकलप्रवासासाठी कर्नाटक पॅटर्न राबवण्याची मागणी; काय आहे हा पॅटर्न?Source link