Home मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी आणि भटके विमुक्तांचे राजकीय आरक्षण संपुष्टात; ठाणे जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी आणि भटके विमुक्तांचे राजकीय आरक्षण संपुष्टात; ठाणे जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन

0
महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी आणि भटके विमुक्तांचे राजकीय आरक्षण संपुष्टात; ठाणे जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन

ठाणे – प्रतिनिधी ( योगेश परदेशी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भाजपातर्फे बुधवार दि.15 सप्टेंबर रोजी शहापुर तहसीलदार कार्यालय येथे केंद्रीय मंत्री तथा खासदार कपिलजी पाटील साहेब व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाने ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर साहेबांच्या निर्देशाने ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण रविंद्र चंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन ,निदर्शने करण्यात आले.

ओबीसीच्या आरक्षणासाठी आघाडी शासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. त्यामुळे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही. यावेळी जिल्हा नेते अशोकजी इरणक, जिल्हा युवा ओबासी अध्यक्ष राजेश कुमार शिर्के,प्रशांत फुले,राजेश निमसे,पी सी बोरलीकर,योगेश ठाकरे,रविंद्र गोतारने,अतिष भेरे, तुषार हरड,मारुती शेडमे,तुकाराम मडके यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here