Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र एकनाथ खडसे Vs रक्षा खडसे ; जळगावात रंगणार चुरशीची लढत

एकनाथ खडसे Vs रक्षा खडसे ; जळगावात रंगणार चुरशीची लढत

0
एकनाथ खडसे Vs रक्षा खडसे ; जळगावात रंगणार चुरशीची लढत

जळगाव – जळगावात जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरूद्ध भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीसाठी सुद्दा जोरदार कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याने भाजप स्वतंत्र लढणार आहे. या निवडणूकीसाठी सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते. मात्र काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने सुद्धा भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे. अशी माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. भाजप सर्व 21 जागा लढवणार आहे. तसेच दुकरीकडे काँग्रेसनेसुद्धा स्वबळाचा नारा दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here