अहमदनगर – भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघडी सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोकं कंटाळले आहेत. मंत्री आणि दलालांचे भ्रष्टाचार आज रोज समोर येत आहेत. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील एक मंत्री त्यामध्ये अडकलेला असून प्रकरण जेव्हा बाहेत तेव्हा लोकांना लक्षात येईल या मंत्र्याच्या पापाचाच घडा भरला आहे. असे सुचक विधान आज विखे पाटील यांनी केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यभरात महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोकं कंटाळले आहेत. मंत्री आणि दलालांचे भ्रष्टाचार आज रोज समोर येत आहेत. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील एक मंत्री त्यामध्ये अडकलेला असून प्रकरण जेव्हा बाहेत तेव्हा लोकांना लक्षात येईल.
या सगळ्या मंत्र्यांची पापं भरलेली आहेत आणि आपली पापं झाकण्यासाठी ईडीसारख्या संस्थावर दोषारोप करण्यात येत आहे. ह्या संस्था बदनाम करायच्या म्हणजे आम्ही जो भ्रष्टाचार केला तो लपविला येईल. पण या भ्रमात या मंत्र्यानी राहू नये असे विधान पाटील यांनी केले आहे.
विखे पाटील हे श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेतली नाही मात्र, त्यांचा रोख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येत आहे.
हा मंत्री कोण, असं पत्रकारांनी विचारले असता ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’ असेही विखे पाटील म्हणाले. नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे.