मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायावर भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीला आयटी आणि ईडी ची एवढी भिती का वाटतीये सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनांत चांदणं’दिसतंय अशी टीका त्यांनी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडीला आयटी आणि ईडी ची एवढी भिती का वाटतीये सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनांत चांदणं’दिसतंय अशी टीका त्यांनी केली आहे. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय.. हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल. अशी टीका त्यांनी केली आहे.
ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणा आमच्याविरोधात वापरता ना. मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील, असा खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.