Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान कुसुंबा तर्फे शवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न….

राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान कुसुंबा तर्फे शवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न….

0
राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान कुसुंबा तर्फे शवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न….

धुळे (कुसुंबा) | शासननामा न्यूज ऑनलाईन

धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान तर्फे धनगर समाजास विविध समाजोपयोगी वस्तूंचे लोकार्पण आज रोजी धनगर समाज भवन येथे समाज अध्यक्ष व पंच कमेटीच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले. या शवपेटी चा उपयोग संपूर्ण कुसुंबा गाव व परिसरासाठी होणार आहे

सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी,समाज ऋणातून उतराई होणे,सामाजिक उत्तरदायित्व म्हणून समाजातील समवयस्क समविचारी तरूणांनी समाज सेवेचे व्रत धारण केले आहे.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जेष्ठ श्रेष्ठ पंच कमेटी ज्येष्ठ सदस्य हे होते.प्रथमतः राजे मल्हारराव होळकर व राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.तद्नंतर समाजोपयोगी वस्तू शवपेटी , डायस , 20 खुर्च्या ,भक्तीगीत असलेले पेन ड्राईव्ह यांचे सर्व पंचकमेटी, समाज बांधव ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर यांच्या उपस्थितीत लोकार्पण करून समाजाच्या स्वाधीन करण्यात आले.

तद्नंतर धनगर समाज पंच कमेटीच्या आजी माजी सदस्यांचे पुष्पगुच्छ व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित समाज बांधव यांच्यातून काही प्रातीनिधीक मान्यवरांमधून श्री. रविंद्र बंडू परदेशी, जिजाताई धनगर, पं. स. सदस्य रितेश परदेशी, डॉ. दत्ता परदेशी यांनी राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान च्या केलेल्या कार्याचा आपल्या मनोगतातुन गौरव केला व राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान यांनी राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच या समाज कार्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासित केले. राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानाच्या स्तुत्य अशा समाज उपयुक्त उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी कार्यक्रमास समाज मा.अध्यक्ष निंबा परदेशी सल्लागार मंडळ गेंदानाना परदेशी,जगन्नाथ आण्णा परदेशी,लुकडू आप्पा परदेशी, निंबा धनगर ,समाज अध्यक्ष छबीलाल परदेशी,उपाध्यक्ष नारायण परदेशी,पंच कमेटी सदस्य जिजाताई धनगर,बाबुलाल परदेशी,प्रदिप परदेशी,रतन आण्णा परदेशी,दत्तात्रय परदेशी,दिलीप परदेशी, प्रकाश परदेशी , जगदिश परदेशी ,ग्रा.पं.सदस्य राजू पहेलवान, मा. उपसरपंच अरुण परदेशी,सुरेंद्र परदेशी,अजय गढरी ,सुरेश गुजेला,राजेश गढरी,धनगर समाज उन्नती मंडळ पदाधिकारी,समस्त समाज बांधव मित्र परिवार आदि उपस्थित होते.

कार्यक्रमांचे सुत्रसंचालन विशाल परदेशी यांनी केले.प्रास्ताविक धिरज परदेशी यांनी केले.कार्यक्रम हिशेब सुनिल परदेशी यांनी सादर केले. योगेश छबिलाल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले आणि आभार प्रदर्शन प्रविण परदेशी यांनी केले. कार्यक्रमास राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानाचे सर्व शिलेदार व युवा मित्रांनी सहकार्य केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here