सेवानिवृत्ती निमित्त सारथ्याचे सारथ्य करून साहेबांनी केला आदरभाव प्रकट!!!

0
61

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

पुणे मंडलचे मुख्य यांत्रिक अभियंता विजयसिंहराव दडस यांनी आपल्या सेवानिवृत्त चालकास सेवानिवृत्तीच्या दिवशी स्वतः गाडी चालवत घरी पोहच करत, एक माणूसकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, गोपी परमेश्वर नायर यांची ४० हून अधिक वर्ष पुणे मंडलमध्ये चालक म्हणून सेवा पूर्ण झाली. आज त्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस होता. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या भेटीनंतर गोपी नायर यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी विजयसिंह दडस यांनी आनंदाचा धक्का दिला. मागील तीन वर्षापासून नायर हे त्यांचे वरिष्ठ अधिकारी विजयसिंह दडस यांच्या गाडीचे सारथ्य करत होते. परंतू, सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी विजसिंह दडस यांनी स्वतः गाडीचे सारथ्य करत आणि आपला चालक गोपी नायर यांना मागील सिटवर बसवून सन्मानाने घरी पोहच केले. गोपी नायर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांसाठी हा आनंदाचा व भावनिक असा प्रसंग ठरला. माणूसकीचे हे अत्यंत दुर्लभ असे उदाहरण पाहण्यास मिळाले.