कल्याण (प्रतिनिधी) : शासननामा न्यूज ऑनलाईन
भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी शिवाजी आव्हाड यांची निवड करण्यात आली. शिवाजी आव्हाड यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी निवड केली.
भटके विमुक्त आघाडी प्रदेश सहसंयोजक अशोक चोरमले, धरमसिंग राठोड, गोविंदा गुंजाळकर, रोहित माडेवार, महिला संयोजिका डॉ. उज्वलाताई हाके, सहसंयोजिक रश्मीताई जाधव, युवा प्रदेश संयोजक अमोल गायकवाड, युवा सहसंयोजक अशोक शेळके, प्रसिद्ध प्रमुख प्रमोद परदेशी, कोकण संयोजक श्रीराम इदाते, महिला संयोजिका डॉ समीरा भारती, मराठवाडा महिला संयोजिका डॉ.उज्वालाताई दईफोडे, कार्यलयमंत्री राज खैरनार आदींनी निवडीबद्दल अभिनंदन केले.