राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नवे आदेश जारी

0
37

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे निम्मे आमदार सोबत घेत बंडखोरी केली आहे. यामुळे आता बंडखोरांविरोधात शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. याचीच खबरदारी घेत मुंबईमध्ये आता जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असे चित्र सध्या निर्माण झालंय. एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत लागलंय. मात्र, याचदरम्यान आता राज्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरूवात केलीयं.

याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट झाली आहे. मुंबईमध्ये 10 जुलैपर्यंत 144 लागू करत जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत. यामध्ये काही अपवादात्मक बाबींना सूट आहे. मात्र, लाऊडस्पीकर वैगेरे इत्यादी बाबींवर बंदी आहे.  सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सुरक्षा दिली जाणार आहे. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर सुद्धा पोलिसांचे विशेष टीम लक्ष ठेवणार आहे. हिंसक बॅंनर पोस्टर तात्काळ काढण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. राज्यात सध्या राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार हे आदेश जारी केले आहे. त्याचबरोबर सर्व पक्षांना आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी शांततेचे आवाहन केलं आहे. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत.

दरम्यान, राज्यात शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आहेत. दोन गटांत शिवसेना विभागली गेल्याचं चित्र आहे. काही कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं आहेत. तर काही कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं उभे आहेत. उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला टार्गेट करत मोठी तोडफोड करण्यात आलीयं. खारघर येथे शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.

एकनाथ शिंदेसह त्यांच्यासह गेलेल्या बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थानात होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून आमदार खासदार आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त देखील वाढवला आहे. राजकीय बॅनरबाजी होणार नाही, याकडेही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आंदोलन किंवा हिंसा होणार यांची याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.

Source link