
मुंबई – राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीचा सपाट लावला असल्याचे पहायला मिळालें. ‘५० खोके एकदम ओके’ ‘करून महाराष्ट्राशी गद्दारी सत्तेत आली शिंदेंची स्वारी’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली होती.
काल अधिवेशनामध्ये अनेक महत्वाच्या विधेयकांवर चर्चा झाली परंतु आज मात्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर वेगळंच चित्र पाहायला मिळाल. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये सभागृहाबाहेर तुफान राडा झाला. यावेळी सर्वपक्षीय आमदार आपापसात भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. जोरदार धक्काबुक्कीसह विरोधकांची सरकारविरोधातील घोषणा दिल्याचे पहायला मिळाले.
विरोधक आमदार पायऱ्यांवर निदर्शने करणार या आधी सत्ताधार्यांनी पायऱ्यांवर जाऊन घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर विरोधी आमदार आल्यावर त्यांनीदेखील घोषणा द्यायला सुरुवात केली. अशात शाब्दिक बाचाबाचीला सुरुवात झाली आणि पायऱ्यांवरच आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले.
भरत गोगावले संतापले
शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. गोगावले यावेळी म्हणाले,दररोज विरोधक याठिकाणी आंदोलन करत होते तेव्हा आम्ही शांत होतो परंतु आज आम्ही त्यांच्या जागेवर आंदोलन केलं तर त्यांना का झोंबल तसेच आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ”.
या बाचाबाचीमध्ये शिंदे गट विरूद्ध महाविकास आघाडीतील आमदार आपसात भिडले. शिंदे गटातील आमदारांनी धक्काबुक्कीसह शिवीगाळ केली अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजूला होण्यास सांगितले त्यानंतर आम्ही देखील बाजूला झाल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.
[ad_2]