Yashwant Ratna Award 2023; यशवंतरत्न पुरस्कार सोहळ्यात अविनाश धर्माधिकारी व यशपाल भिंगे यांच्या वक्तृत्वाची पर्वणी !!

0
53

पुणे (विशेष प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने यशवंतरत्न पुरस्कार (Yashwant Ratna Award 2023) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणुन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी (Avinash Dharmadhikari) व इतिहास अभ्यासक, लेखक डॉ. यशपाल भिंगे (Dr. Yashpal Bhinge) असणार आहेत. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मा.कुलगुरू नितीन करमाळकर (savitribai phule pune university Ex. Vice-Chancellors Prof. (Dr.) Nitin R. Karmalkar) असतील. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) ,दत्ता भरणे, आमदार सुनील कांबळे, मा. आमदार रामराव वडकुते,निवृत्त पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव , जगदीश मुळीक, प्रशांत जगताप , आप संघटक विजय कुंभार, विश्र्वशांती फाऊंडेशन विश्वस्त दत्ता कोहीनकर, इंदोर संस्थानचे भूषनसिंह होळकर नेत्रतजज्ञ अनिल दुधभाते, उद्योजक विवेक बिडगर, सनदी लेखापाल लहुराज गंडे, उज्वलाताई हाके हे असणार आहेत.

पुरस्कारार्थिंच्या मध्ये सामाजिक क्षेत्र लुसी कुरियन, उद्योग क्षेत्र सुप्रिया बडवे, क्रीडा क्षेत्र संतोष गायके , शैक्षणिक क्षेत्र गणेश हाके, प्रसार माध्यम क्षेत्र तुषार खरात , शेती क्षेत्र विवेक खिलारे , प्रशासकीय क्षेत्र सुखदेव जमदाडे – प्रदीप भोर, वैद्यकीय क्षेत्र प्रवीण सहावे, सामाजिक संस्था आई कलाग्राम फाऊंडेशन, आदर्श महिला रुपाली जोशी, आदर्श तरुण क्षेत्र प्रमोद परदेशी , विशेष कार्य विठ्ठल काटे, अंकुशराव भांड,दीपक भोजने, सौरभ हटकर, जीवन गौरव पुरस्कार गणेश पुजारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित असतील.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अपरिचित विरश्रिचा इतिहास उजेडात येण्यास मदत होईल असे समितीचे अध्यक्ष विजय गोफने सचिव सोमनाथ देवकाते यांनी सांगितले संयोजन समितीचे पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत. हा कार्यक्रम १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स टिळक रोड स्वारगेट या ठिकाणी असणार आहे.