पुणे (विशेष प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने यशवंतरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स पुणे या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणुन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी (चाणक्य मंडळ, पुणे) बोलत होते. भारताच्या इतिहासातील दाखले देताना महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इंदोरवर जर दुसरा बाजीराव पेशवा व दौलतराव शिंदे यांनी हल्ला केला नसता तर जॉन माल्कम हा दिल्लीतील किल्ल्यात घेरून महाराजा यशवंतराव होळकर यांनी पराजित केला असता व भारतावर इंग्रजांचे राज्यच आले नसते असे सांगीतले.
त्याच बरोबर इतिहास अभ्यासक, लेखक डॉ. यशपाल भिंगे यांनी इतिहासातील अपरिचित नोंदींचे तारखासह पुरावे देऊन महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अपरिचित इतिहासाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मा.कुलगुरू डॉ नितीन करमाळकर हे होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.मंत्री प्रा. राम शिंदे, साहाय्यक पोलीस आयुक्त पुणे रुक्मीणी गलांडे, निवृत्त पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव , आप संघटक विजय कुंभार, विश्र्वशांती फाऊंडेशन विश्वस्त डॉ दत्ता कोहीनकर, सनदी लेखापाल लहुराज गंडे, डॉ उज्वलाताई हाके , आप्पासाहेब आखाडे , शशिकांत वडकूते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवर यांना यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक क्षेत्र -लुसी कुरियन, उद्योग क्षेत्र -सुप्रिया बडवे, क्रीडा क्षेत्र -संतोष गायके, शैक्षणिक क्षेत्र -गणेश हाके, प्रसार माध्यम -क्षेत्र तुषार खरात, शेती क्षेत-विवेक खिलारे, प्रशासकीय क्षेत्र – सुखदेव जमदाडे – प्रदीप भोर, वैद्यकीय क्षेत्र – डॉ प्रवीण सहावे, सामाजिक संस्था- आई कलाग्राम फाऊंडेशन, आदर्श महिला- रुपाली जोशी, आदर्श तरुण -क्षेत्र प्रमोद परदेशी , विशेष कार्य -विठ्ठल काटे, अंकुशराव भांड, दीपक भोजने, सौरभ हटकर तसेच जीवन गौरव पुरस्कार गणेश पुजारी यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अपरिचित विरश्रिचा इतिहास उजेडात येण्यास मदत झाली असे समितीचे अध्यक्ष ऍड. विजय गोफने, सचिव सोमनाथ देवकाते यांनी सांगितले. संयोजन समितीचे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड विजय गोफणे यांनी तर सूत्रसंचालन सोमनाथ देवकाते यांनी केले.