Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र प्रमोद परदेशी यांना राज्यस्तरीय आदर्श युवक यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

प्रमोद परदेशी यांना राज्यस्तरीय आदर्श युवक यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

0
प्रमोद परदेशी यांना राज्यस्तरीय आदर्श युवक यशवंतरत्न पुरस्कार प्रदान

पुणे (विशेष प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

नमो ग्रुप फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी यांना युवक क्षेत्रात भरीव कामगिरी साठी चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आदर्श युवक राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्काराने पुरस्काराने गौरविण्यात आले.

आजच्या तरुनाईचा विचार करता त्यांच्या चंगलवादाच्या आकर्षणाचीच चर्चा होते, त्यातही आशेचा किरण दिसतो तो राष्ट्रवादी विचार , विधायकतेने कार्य करणाऱ्या तरुणांचे काम, त्याचेच आपल्या जवळील उदाहरण म्हणजे प्रमोद परदेशी (Pramod Pardeshi) गावोगावी पायपीट गावोगावी जाऊन युवा वर्गाशी संपर्क साधला. त्यांनी हिंदुत्ववादी व ओबीसीतील युवकांना एकत्र करूम राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणुन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी (Avinash Dharmadhikari) बोलत होते भारताच्या इतिहासातील दाखले देताना महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इंदोर वर जर दुसरा बाजीराव पेशवा व दौलतराव शिंदे यांनी हल्ला केला नसता तर जॉन माल्कम हा दिल्लीतील किल्ल्यात घेरून महाराजा यशवंतराव होळकर यांनी पराजित केला असता व भारतावर इंग्रजांचे राज्यच आले नसते असे सांगीतले, त्याच बरोबर इतिहास अभ्यासक, लेखक डॉ. यशपाल भिंगे (Dr. Yashpal Bhinge) यांनी इतिहासातील अपरिचित नोंदींचे तारखा सह पुरावे देऊन महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अपरिचित इतिहासाची माहिती दिली. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मा.कुलगुरू नितीन करमाळकर (savitribai phule pune university Ex. Vice-Chancellors Prof. (Dr.) Nitin R. Karmalkar) हे होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) , भाजपा भटके विमुक्त आघाडी महिला प्रदेश अध्यक्ष डॉ उज्वलाताई हाके साहाय्यक पोलीस आयुक्त पुणे रुक्मीजी गलांडे, निवृत्त पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव , आप संघटक विजय कुंभार, विश्र्वशांती फाऊंडेशन विश्वस्त दत्ता कोहीनकर, सनदी लेखापाल लहुराज गंडे, भाजपा नेत्या उपस्थित होते.

पुरस्कारार्थिंच्या मध्ये सामाजिक क्षेत्र लुसी कुरियन, उद्योग क्षेत्र सुप्रिया बडवे, क्रीडा क्षेत्र संतोष गायके, शैक्षणिक क्षेत्र गणेश हाके, प्रसार माध्यम क्षेत्र तुषार खरात, शेती क्षेत्र विवेक खिलारे, प्रशासकीय क्षेत्र सुखदेव जमदाडे – प्रदीप भोर, वैद्यकीय क्षेत्र प्रवीण सहावे, सामाजिक संस्था आई कलाग्राम फाऊंडेशन, आदर्श महिला रुपाली जोशी, विशेष कार्य विठ्ठल काटे, अंकुशराव भांड, दीपक भोजने, सौरभ हटकर तसेच जीवन गौरव पुरस्कार गणेश पुजारी यांना सन्मानित करण्यात आले तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अपरिचित विरश्रिचा इतिहास उजेडात येण्यास मदत झाली असे समितीचे अध्यक्ष ऍड. विजय गोफने, सचिव सोमनाथ देवकाते यांनी सांगितले. संयोजन समितीचे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here