Home मनोरंजन Mental Health : सोशल मीडियाचे व्यसन ‘हे’ धूम्रपान-दारूच्या व्यसनाइतकेच खतरनाक, लहान मुलांसाठी...

Mental Health : सोशल मीडियाचे व्यसन ‘हे’ धूम्रपान-दारूच्या व्यसनाइतकेच खतरनाक, लहान मुलांसाठी असू शकते चिंतेची बाब !

0
30

पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

अन्न,वस्त्र आणि निवारा या तीन माणसाच्या मूलभूत गरजा आहेत पण आताच्या काळात त्याला जोड मिळाली ती सोशल मीडियाची. रोजच्या जीवनात सोशल मीडियाचा वापर करून आपण त्याला मूलभूत गरज बनवून घेतली आहे.

रिल्स बघणे, रिल्स बनवणे, व्हॉट्सअप, फेसबुक,इंस्टाग्राम,स्नॅपचॅट याचा वापर एवढा वाढला आहे की, लहान मुलांना देखील त्याचे वेड लागले आहे.

काही नवीन वस्तू खरेदी (Shop) केली किंवा कधी हॉटेल (Hotel) मध्ये गेलो तर सर्वात आधी सोशल मीडियावर आपण अपडेट करतो किंवा फोटो पोस्ट करतो. काही रिपोर्ट्सनुसार १३ते४७ वयोगटातील लोक ४/६ तास सोशल मीडिया वर वेळ घालवत असतात ते आरोग्यासाठी नुकसान कारक आहे, विषेश म्हणजे लहान मुलांना मध्ये सोशल मीडियाचा वापर खूप वाढलेला आहे ही सवय खूप गंभीर असू शकते. जाणून घेऊया यांचा मुलांवर (child) कसा परिणाम होतो.

Mental Health : सोशल मीडियाचे व्यसन 'हे' धूम्रपान-दारूच्या व्यसनाइतकेच खतरनाक, लहान मुलांसाठी असू शकते चिंतेची बाब !
  1. लहान मुलांमध्ये वाढत आहे निराशा

रिपोर्टनुसार २००९ ते २०१९ या वर्षात लहान मुलानं मध्ये सतत नैराश्य वाढत आहे त्यात ३० टक्के वाढ झालेली आहे.कंपन्या मुलांना आकर्षित करणारे कंटेंट त्यात करतात मूल आकर्षित होतात आणि खूप वेळ त्याचा वेळ तिथे वाया जातो त्यांना सवई लागते तिथे खूप वेळ घालवायचा आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर (Health) होतो.त्याचे एकमेव कारण म्हणजे सोशल मीडियाचा तासनतास उपयोग करणे.

  1. मानसिक आरोग्य संबधित

रिसर्चनुसार ६९% प्रोढ आणि ८१% किशोरवयात मूल करतात.त्यातले हे मील रोज ९ तास ऑनलाइन सर्च मध्ये घालवत असतात हे २०१५ घ्या सेन्स मध्ये आढलून आले.लोकांचा बहुताश वेळ सोशल मीडिया वर जातो त्यामुळे चिंता,तणाव हे मानसिक आरोग्य (Mental Health) त्यांचे स्थिर रहात नाही म्हणून चिंताग्रस्त दुःखी रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

  1. मनोचिकित्सक काय म्हणतात?

डॉक्टरांचे असे मत आहे की, मुलांमध्ये सोशल मीडियाचे वाढते व्यसन हे दारू आणि धूम्रपानाइतकेच हानिकारक आहे. त्याचा मानसिक विकासावर तर परिणाम होत आहेच, पण त्यामुळे कमी वयात नैराश्याचे रुग्णही वाढत आहेत. मुलांमध्ये वर्तनात असामान्य बदल दिसून येत आहेत, मुलांमध्ये चिडचिड-राग, दुःख, कामात रस कमी होणे अशा तक्रारी वाढत आहेत. याशिवाय सोशल मीडिया/मोबाईलच्या (Mobile) अतिवापरामुळे झोपेवरही परिणाम होत आहे. मुलांना पुरेशी झोप मिळत नाही त्यामुळे नैराश्य (Depression) आणि स्मरणशक्तीशी संबंधित विकार वाढत आहेत.

  1. पालकांनी विशेष लक्ष द्यावे

डॉक्टर म्हणतात मुले सोशल मीडिया/मोबाईलवर कमी वेळ घालवतात याची काळजी प्रत्येक पालकाने घेणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी आधी स्वतःच्या सवयी सुधारायला हव्यात. मूल ज्या प्रकारची आपल्याला पाहते त्याचा त्याच्या मानसिक स्थितीवर आणि वागणुकीवर थेट परिणाम होतो. वाढत्या सोशल मीडिया व्यसनामुळे अप्रत्यक्षपणे स्क्रीन टाइम वाढतो, या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आव्हानात्मक समस्या आहेत. सर्व वयोगटातील लोकांनी मोबाईलचे व्यसन होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे.