साक्री (योगेश भामरे) | शासननामा न्यूज ऑनलाईन
साक्री येथील महावितरण कंपनी येथे शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नां संदर्भात किसान मोर्चा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा व जिल्ह्याचे युवा नेतृत्व भैय्यासो चंद्रजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
भारतीय जनता पार्टी साक्री तालुका कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली तालुक्यातील काटवान भागातील काही गावे माळमाथा-पश्चिम पट्टयातील काही गावे यातून ५०० ते ७०० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यानंतर विविध समस्यांबाबत तालुक्याचे विद्युत महामंडळाचे ज्युनिअर इंजि.यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नांसंदर्भात येण्याऱ्या अडीअडचणींवर मार्ग काढण्यासाठी व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
चर्चेचे मुख्य विषय म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोटेशन त्यांना विनाविलंब त्वरित मिळावे,ज्या शेतकऱ्यांनी रोहित्राची मागणी केली असेल त्यांना ते त्वरित मिळावे,ज्यांची रोहित्र जळाली आहेत त्यांना ती त्वरीत बसविण्यात यावी व ज्या रोहित्रांवर अतिरिक्त भार असेल त्या रोहित्रांचे विभाजन करून नवीन रोहित्र उपलब्ध करून देणे तसेच ट्रान्सफार्मरसाठी लागणाऱ्या मेंटेनन्स संदर्भात वायरमन किंवा विद्युत महामंडळाच्या कुठल्याही कर्मचाऱ्याकडून निशुल्क सेवा पुरवली जावी त्यासंदर्भात शेतकऱ्यांकडून कुठलीही तक्रार येणार नाही याची वरिष्ठांनी काळजी घ्यावी यासारख्या अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष भैय्यासो चंद्रजित पाटील, जिल्हासरचिटणी शैलेंद्रजी आजगे, तालुकाध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे, तालुकाउपाध्यक्ष राकेशजी दहिते, सहकार आघाडीचे विभाग संयोजक योगेशजी भामरे, आत्मनिर्भर भारत अभियानाचे जिल्हा सहसंयोजक श्रीकांतजी कार्ले , तालुका सरचिटणीस चंद्रकांतजी पवार,शहर अध्यक्ष कल्याणजी भोसले, शहर सरचिटणीस श्री.योगेश चौधरी, पंकज हिरे सह पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.