Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा विविध सेवा कार्याने संपन्न.!!!

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा विविध सेवा कार्याने संपन्न.!!!

0
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा विविध सेवा कार्याने संपन्न.!!!


पुणे (शासननामा न्यूज )

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त अखिल भवानी पेठ स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सेवा कार्यांचे आयोजन करण्यात आले.


चार दिवसांच्या स्वामी समर्थ महाराज प्रकट दीन सोहळ्यामध्ये
पहिल्या दिवशी होम हवन ,परदेशी ग्रुप साई भक्ती भजन , महाआरती महाप्रसाद करण्यात आला. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ यावर इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान झाले.
तिसऱ्या दिवशी दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे भवानी पेठ मटण मार्केट जवळ आयोजन करण्यात आले.
चवथ्या दिवशी दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिपज्योत तरुण मंडळ काशेवाडी आदेश ग्रुप या ठिकाणी करण्यात आले करण्यात
या कार्यक्रमास मार्गदर्शक आमदार सुनील कांबळे , मनोहर मामा भोसले हेमंत रासने, गणेश बिडकर, अजय भोसले, डॉ शिंदे सर,मा नगरसेवक महेश पुंडे, तुषार पाटील, अविनाश बागवे, अजय खेडेकर, सौ मनीषा लडकत, स्वप्नील मासाळ, संतोष कुंजीर, नवनाथ लोखंडे सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी भक्तिमय वातावरणात भेट दिली
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विक्की पांडुरंग ढोले यांनी पुणे शहरातील अनेक मान्यवर पाहुण्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रित केले या कार्यक्रमास यशस्वीतेसाठी स्वामी समर्थ भक्त परिवाराने परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here