Home सरकारी योजना Maharashtra Atal Construction Workers Awas Yojana (Rural) 2023 | अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023

Maharashtra Atal Construction Workers Awas Yojana (Rural) 2023 | अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023

0
Maharashtra Atal Construction Workers Awas Yojana (Rural) 2023 | अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023

महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात त्यांच्या स्वतःच्या जागेवर नवीन घर अथवा अस्तित्वात असलेले कच्चे घर, या कच्च्या घराचे बांधकाम करून पक्क्या घरकुलात रुपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण), कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबविण्याचे सुरु केले आहे आणि त्याचबरोबर यासाठी 1,50,000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील बांधकाम कामगार लाभार्थ्यांकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे, यासंदर्भात लाभार्थ्यांनी खरेदी केलेली जमीन आणि इतर संबंधित बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी शासनाकडून अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेचा लाभ घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून घर बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे. असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून आर्थिक सहाय्य मिळण्यास पात्र असतील.

ज्या बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2022 या योजनेचा लाभ घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून घर बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज सादर केलेला आहे, अशा लाभार्थी बांधकाम कामगारांना जमीन खरेदी व घरबांधणीच्या संबंधित बाबींसाठी लेलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 50,000/- रुपये पर्यंतचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येत आहे. आणि हे मंजूर आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात जवळपास 26 लाख बांधकाम कामगार आहेत, यापैकी सुमारे 12.5 लाख बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत आहे, या नोंदणीकृत कामगारांपैकी ग्रामीण भागातील जवळपास 4 लाख बांधकाम कामगारांकडे पक्के घर नाहीत. या सर्व बांधकाम कामगारांना घर बांधणीसाठी अर्थ सहाय्य करण्याचा शासनाचा उद्देश आहे. यासाठी त्यांच्याकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे.  

अटल बांधकाम कामगार आवास योजना 2023 (ग्रामीण) Highlights

योजनाअटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)
व्दारा सुरुमहाराष्ट्र सरकार
योजनेची सुरुवात2018
लाभार्थीराज्याचे नोंदणीकृत कामगार
राज्यमहाराष्ट्र
उद्देश्यकामगारांना स्वतः चे हक्काचे घरकुल मिळावे म्हणून आर्थिक सहाय्य
अधिकृत वेबसाईटmahabocw.in
आर्थिक लाभघर बांधण्यासाठी 1.50 लाख पर्यंत आर्थिक सहाय्य
विभागमहाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
श्रेणीआवास योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) उद्दिष्टे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत ग्रामीण भागातील सुमारे चार लाख बांधकाम कामगार ज्यांच्या कडे पक्के घर नाहीत, तसेच घरा संबंधित मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत अशा ग्रामीण बांधकाम कामगारांना या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावणे त्याचबरोबर त्यांना सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा अत्यंत महत्वाचा शासनाचा उद्देश आहे. तसेच ग्रामीण भागातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देता यावे आणि त्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे जीवनयापन करता यावे हा शासनाचा उद्देश आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा निधी सहजतेने उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडून योजनेचा निधी लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यासाठी DBT मोडचा वापर करण्यात येत आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) योजनेचे स्वरूप

महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांमधून ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) कामगार यांच्या साठी मंजूर करण्यात आलेली अटल बांधकाम कामगार आवास योजनेची कार्यपद्धती आणि योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) असलेल्या बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी 1.50 लाख रुपये अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर (MGNREGA) निर्धारित असलेले 18,000/- रुपये त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी निर्धारित असलेले 12,000/- रुपये असे एकूण 30,000/- रुपये अनुदान 1.50 लाख यामध्ये समाविष्ट असल्यामुळे संबंधित योजनांचा पुन्हा लाभ देय राहणार नाही.

योजनेंतर्गत असणारे घरकुलाचे क्षेत्रफळ :-

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान 269 चौ. फूट इतके चटई क्षेत्र असलेले बांधकाम करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना 1.50 लाख एवढे अनुदान देय राहील. परंतु लाभार्थ्यांना त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम करण्याचे असल्यास, लाभार्थ्यांना ते स्वखर्चाने करावे लागेल.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी पात्रता

महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांमधून ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामाग्रांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेचा लाभ प्रती कुटुंबासाठी असून, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे राहील.

  • अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बांधकाम कामगार हा कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) असावा तथापि अर्ज करतांना पात्र लाभार्थी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
  • या योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारांचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • या योजनेमध्ये अर्जदार बांधकाम कामगाराने वर्षभरात किमान 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.

  • या योजनेच्या अंतर्गत मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के, सिमेंट वाळूने बांधलेले घर नसावे. यासाठी पुरावा म्हणून स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक असेल.
  • या योजनेच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावाने स्वतःच्या मालकीची जागा असावी किंवा स्वतःच्या मालकीचे कच्चे घर असावे जेणेकरून त्या ठिकाणी पक्के घर बांधता येईल.
  • या योजनेंतर्गत बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करिता अनुज्ञेय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र किंवा शपथपत्र सादर करणे आवश्यक असेल.
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) योजनेचा लाभ प्रती कुटुंबासाठी आहे. एकदा लाभ मिळाल्यानंतर बांधकाम कामगार पुन्हा या योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार नाही.
  • कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

महाराष्ट्र अटल बांधकाम कामगार आवास योजना 2023 आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ मिळविण्याकरिता विहित अर्जासह खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असेल.

  • सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिकृत नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेले प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • 7/12 च उतारा / मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र
  • बँकेच्या पासबुकाची प्रत

अटल बांधकाम कामगार आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाची रचना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील घरकुलाची रचना खालीलप्रमाणे राहील.

  • घरकुलाचे संपूर्ण बांधकाम विटा, वाळू, सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर आणि एक बैठक हॉल यांचा समावेश असावा, यामध्ये शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहील.
  • जोत्यापासून घराची उंची कमीत कमी 10 फूट असावी.
  • छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंटचे पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास परवानगी राहील.
  • घराच्या दर्शनीभागावर मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) लावणे आवश्यक आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना जिल्हा स्तरीय लाभार्थी निवड समिती :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांमधून ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांसाठीच्या अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत केलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी अपर कामगार आयुक्त / कामगार उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 

जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती गठीत करण्यात येत असून समितीची रचना आणि कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे.

अपर कामगार आयुक्त / कामगार उपायुक्तअध्यक्ष
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणासदस्य
जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळसदस्य
उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळसदस्य सचिव 

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) योजनेची कार्यपद्धती

योजनेंतर्गत अर्ज करण्याची पद्धत :-

या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पात्र नोंदणीकृत कामगारांनी जिल्हा कार्यकारी अधिकारी / उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडे मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करावा.

बांधकाम कामगारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून अर्जदारांची पात्रता तसेच अर्जासोबत सादर केलेल्या कागद्पत्रांची जिल्हास्तरीय निवड समिती पडताळणी करेल आणि त्यात पात्र झालेल्या बांधकाम कामगारांची अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये (ग्रामीण) लाभार्थी म्हणून निवड करण्यात येईल.

उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांची तालुका निहाय यादी तयार करतील, सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील आणि त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करून देतील.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2022 
  • सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे ग्राम विकास विभाग यांच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण विभाग, नवी मुंबई यांचेकडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकामा पोटी निधी वर्ग करतील.
  • घरांच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्या टप्प्याने ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (PFMS) प्रणालीव्दारे बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
  • या योजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून 4 टक्के एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहील.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदअध्यक्ष
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणासदस्य
कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदसदस्य
उपकार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळसदस्य सचिव 

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अर्ज PDF ऑनलाइन डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र अर्जदार बांधकाम कामगारांनी अर्ज PDF ऑनलाइन डाऊनलोड करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2022
  • सर्व प्रथम तुम्हाला शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच्या अधिकृत वेबसाईटवर https://mahabocw.in भेट द्यवी लागेल.
  • या नंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल, या होम पेजवर स्क्रोल करून तुम्हाला ‘’कल्याणकारी योजना’’ हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करावे लागेल. किंवा थेट या लिंकवर https://mahabocw.in/welfare-schemes/ क्लिक करा.
  • आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला स्क्रोल करावे लागेल, या पेजवर स्क्रोल करून ‘’आर्थिक’’ विभागामध्ये ‘’अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
अटल बांधकाम कामगार आवास योजना अर्ज pdf  
  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर ‘’फॉर्म डाऊनलोड करा’’ हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा, या पर्यायावर क्लिक करताच योजनेचा फॉर्म डाउनलोड होईल.
  • महाराष्ट्र अटल बांधकाम कामगार आवास योजना 2022 (ग्रामीण) योजनेच्या अर्जाचा PDF नमुना खालीलप्रमाणे दिसेल.
योजना शासन निर्णय PDFइथे क्लिक करा
योजना अर्ज डाऊनलोड PDFइथे क्लिक करा 
शासन निर्णय PDFइथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटइथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here